सेल्फी घेताना माजी क्रिकेटपटू शेखर गवळी दरीत कोसळले; आज मृतदेह सापडला - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Wednesday, September 2, 2020

सेल्फी घेताना माजी क्रिकेटपटू शेखर गवळी दरीत कोसळले; आज मृतदेह सापडला

https://ift.tt/3jDusgI
नाशिक: महाराष्ट्राचे माजी क्रिकेटपटू यांचा मृतदेह बुधवारी सकाळी सापडला. मंगळवारी तालुक्यातील पर्यटनासाठी गेलेले शेखर गवळी सेल्फी घेत असताना दरीत कोसळले होते. आज सकाळपासून शोध कार्याला सुरूवात जाली होती. जिल्हा आपत्ती प्राधिकरणाच्या पथकाला तीन तासांच्या अथक परिश्रमानंतर त्यांचा मृतदेह मिळाला. वाचा- शेखर गवळी आणि त्यांचे काही मित्र इगतपुरी तालुक्यात असलेल्या मानस हॉटेल परिसरात पर्यटनासाठी गेले होते. एक उंच कठड्यावर उभे राहून सेल्फी घेत असताना २५० फूट दरीत कोसळले. त्यानंतर स्थानिक ग्रामस्थांनी त्यांचा शोध घेण्याचा प्रयत्न केला असता पण शोध लागला नाही. त्यानंतर आपत्कालीन यंत्रणेने शेखर गवळी यांचा शोध घेण्याचा प्रयत्न केला परंतु संध्याकाळपर्यंत शोध लागला नव्हता. वाचा- ही घटना काल संध्याकाळी ५.३० च्या सुमारास घडली. काल अंधार पडल्याने व दरीत पाण्याचा प्रवाह जास्त असल्याने स्थानिक प्रशासनाने शोध कार्य थांबवले होते. त्यानंतर आज बुधवारी सकळी पुन्हा एकदा शोध कार्याला सुरुवात करण्यात आली. वाचा- शेखर गवळी महाराष्ट्राच्या २३ वर्षाखालील क्रिकेट संघाचे फिटनेस कोच देखील होते.