आता बास झाले; लवकर ऑफिस सुरू करा! - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Thursday, September 3, 2020

आता बास झाले; लवकर ऑफिस सुरू करा!

https://ift.tt/2Z1vTxH
मुंबई: व्हायरसचे संक्रमण रोखण्यासाठी अनेक कंपन्यांनी कर्मचाऱ्यांना घरातून अर्थात वर्क फ्रॉम होमची सुविधा दिली. विशेषत: आयटी सेक्टर आणि अन्य काही कर्मचारी ज्यांचे काम घरातून होऊ शकते ते सहा महिन्यांपेक्षा अधिक काळ झाले घरातून काम करत आहेत. पण आता या कर्मचाऱ्यांना याचा कंटाळा आला आहे. वाचा- घरातून काम करणारे अधिक तर कर्मचारी आता कंटाळले आहेत आणि ते ऑफिसच्या वातावरणाला मिस करत आहेत. आंतरराष्ट्रीय संपत्ती सल्लागार नाइट फ्रँक इंडियाच्या एका सर्व्हेमधून ही गोष्ट समोर आली आहे. वाचा- या सर्व्हेमधील ९० टक्के कर्मचाऱ्यांनी घरातून काम करताना ऑफिसची आठवण येत असल्याचे म्हटले आहे. शहरानुसार विचार केला तर दिल्ली आणि परिसरातील ९८ टक्के, मुंबईतील ९४ टक्के, बेंगळूरू ९१ टक्के, चेन्नई ९० टक्के, पुणे ८८ टक्के आणि हैदराबाद ८१ टक्के कर्मचाऱ्यांना ऑफिसची आठवण येत आहे. करोनामुळे लागू करण्यात आलेल्या वर्क फ्रॉम होममुळे कामाची क्षमता आणि कामगिरीवर परिणाम झाल्याचे समोर आले आहे. सर्व्हेतील ३० टक्के कर्मचाऱ्यांनी घरातून काम केल्यामुळे क्षमता आणि कामगिरी यावर परिणाम झाल्याचे म्हटले आहे. वाचा- घरातून काम केल्यामुळे ६० टक्के लोकांनी प्रवासाचा वेळ वाचतो, ५८ टक्के लोकांनी बचत होते असे म्हटले आहे. पण त्याच वेली सामाजिक आयुष्य नसल्याचे देखील म्हटले आहे. वाचा- भारतातील आयटी कंपन्या प्रत्येक वर्षी त्यांच्या एकूण उत्पन्नाच्या ४.३ टक्के खर्च ऑफिसच्या भाड्यासाठी खर्च करतात. छोट्या आयटी कंपन्या ४.७ टक्के तर मोठ्या आयटी कंपन्या ४.४ टक्के आणि मध्यम ३.६ टक्के इतका खर्च करतात. वाचा- वर्क फ्रॉम होमचा उद्देश करोनाचे संक्रमण रोखण्याचा होता. पण भारतात रुग्णांची संख्या सातत्याने वाढत आहे. परिस्थितीत जशी सामान्य होते आणि अर्थव्यवस्था खुली होते तेव्हा हे पाहाणे उत्सुकतेचे ठरणार आहे की किती कर्मचारी वर्क फ्रॉम होमचा पर्याय निवडतात.