IPL 2020 Points Table चेन्नईचा सलग दुसरा पराभव; पाहा गुणतक्त्यात कोणता संघ कुठे आहे - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Saturday, September 26, 2020

IPL 2020 Points Table चेन्नईचा सलग दुसरा पराभव; पाहा गुणतक्त्यात कोणता संघ कुठे आहे

https://ift.tt/3j7wMwt
नवी दिल्ली: points table आयपीएलच्या १३व्या हंगामातील पहिल्या सामन्यात मुंबई इंडियन्सवर विजय मिळवत () ने शानदार सुरुवात केली. पण त्यानंतर सलग दोन सामन्यात त्यांचा पराभव झाला. राजस्थान रॉयल्सने त्यांचा १६ धावांनी तर काल () ने त्यांचा ४९ धावांनी पराभव केला. दिल्लीने पहिल्या सामन्यात पंजबवर सुपर ओव्हरमध्ये विजय मिळवला होता. तर कालच्या चेन्नईवरील विजयामुळे त्यांचे ४ गुण झाले आहेत. या विजयासह ते गुणतक्त्यात अव्वल स्थानी पोहोचले आहेत. आतापर्यंत खेळलेल्या दोन्ही सामन्यात दिल्लीने विजय मिळवल आहे. तर चेन्नईने सर्वाधिक ३ सामने खेळले असून त्यांना फक्त एकाच सामन्यात विजय मिळवता आलाय. वाचा- गुणतक्त्यात दिल्ली जरी अव्वल स्थानी असली तरी सरासरीचा विचार करता दुसऱ्या स्थानावर असेलल्या किंग्ज इलेव्हन पंजाबचा संघ आघाडीवर आहे. त्यांची सरासरी +२.४२५ इतकी आहे. तर दिल्लीची +१.१०० इतकी आहे. दोन गुणांसह तिसऱ्या स्थानावर मुंबई असून त्यांची सरासरी +०.९९३ इतकी आहे. राजस्थान रॉयल्स दोन गुण आणि +०.८०० सरासरीसह चौथ्या, चेन्नई दोन गुण आणि -०.८४० सरासरीसह पाचव्या, रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू २ गुण आणि -२.१७५ सरासरीसह सहाव्या, हैदराबाद -०.५०० सरासरीसह सातव्या तर कोलकाता नाइट रायडर्स -२.४५० सरासरीसह आठव्या स्थानावर आहेत. कोलकाता आणि हैदराबाद संघाला अद्याप एकही विजय मिळवता आला नाही.