
नवी दिल्ली: आयपीएलच्या १३व्या हंगामात शनिवारी झालेल्या सामन्यात () ने ( ) चा ७ विकेटनी पराभव केला. या विजयासह कोलकाताने पहिल्या विजयाची नोंद केली आणि गुणतक्त्यात दिग्गज संघांना मागे टाकले. वाचा- हैदराबाद विरुद्धच्या सामन्यात कोलकाताच्या गोलंदाजांनी अचूक कामगिरी केली. त्यानंतर शुभमन गिलने नाबाद ७० धावा करून संघाला विजय मिळवून दिला. कोलकाता आणि हैदराबाद या दोन्ही संघांनी पहिल्या सामन्यात पराभव स्विकारला होता. त्यामुळे या सामन्यात दोघांना विजयाची सुरुवात करायची होती. वाचा- कोलकात्याच्या विजयानंतर त्यांनी गुणतक्त्यात आठव्या क्रमांकावरून थेट पाचव्या क्रमांकावर झेप घेतली आहे. दिल्लीचा संघ ४ गुणांसह पहिल्या क्रमांकावर आहे. त्यानंतर किंग्ज इलेव्हन पंजाब, मुंबई इंडियन्स, राजस्थान रॉयल्स यांचा क्रमांक लागतो. वाचा- सलग दोन सामन्यात पराभव झालेला चेन्नई सुपर किंग्ज दोन गुण आणि -८४० सरासरीसह सहाव्या तर रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू दोन गुणांसह पण -२.१७५ सरासरीसह सातव्या क्रमाकांवर आहे. हैदराबाद संघाने आतापर्यंत झालेले दोन्ही सामने गमवल्यामुळे ते अखेरच्या म्हणजे आठव्या क्रमाकांवर आहेत. आज रविवारी राजस्थान रॉयल्स विरुद्ध किंग्ज इलेव्हन पंजाब यांच्यात लढत होणार आहे. या लढतीनंतर गुणतक्त्यात पुन्हा एकदा फेरबदल होणार आहे.