IPL: आजची लढत नंबर वन विरुद्ध नंबर आठ; विजय न मिळवलेला संघ जिंकणार का? - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Tuesday, September 29, 2020

IPL: आजची लढत नंबर वन विरुद्ध नंबर आठ; विजय न मिळवलेला संघ जिंकणार का?

https://ift.tt/30i3zaP
अबुधाबी: आयपीएलमधील १३व्या हंगामात आज (मंगळवार) विरुद्ध ( vs ) यांच्यात लढत होत आहे. दिल्लीने आतापर्यंत सर्व सामन्यात विजय मिळवला आहे तर हैदराबादने सर्व सामन्यात पराभव स्विकारला आहे. या दोन्ही संघांनी प्रत्येकी दोन सामने खेळले आहेत. दिल्लीचा संघ ४ गुण आणि +१.१०० सरासरीसह गुणतक्त्यात पहिल्या स्थानावर, तर हैदराबाद अखेरच्या स्थानावर आहे. वाचा- स्पर्धेत आतापर्यंत भारतीय खेळाडूंनी शानदार कामगिरी केली आहे. पण हैदराबाद संघाला अद्याप प्रभावी खेळी करता आली नाही. फलंदाजीसाठी संघातील टॉप ऑर्डरवर अवलंबून असल्याचे चित्र आहे. तर मधळ्याफळीतील फलंदाज कमकूवत दिसत आहेत. फक्त सलामीच्या फलंदाजांच्या जोरावर या संघाचे आयपीएलमधील आव्हान टीकण्याची शक्यता नाही. वाचा- दिल्लीचे सर्व काही भारी दिल्ली संघाने दोन्ही सामन्यात शानदार कामगिरी केली आहे. संघात इशांत शर्मा आणि रविचंद्रन अश्विन हे दोन महत्त्वाचे खेळाडू नसले तरी त्यांच्याकडे कगिसो रबाडा, अमित मिश्रा, आंद्रे नॉर्त्जे, अक्षर पटेल आणि आवेश खान अशी गोलंदाजांची फौज आहे. वाचा- फलंदाजीबाबत बोलायचे झाले तर शिखर धवन, पृथ्वी शॉ, श्रेयस अय्यर, ऋषभ पंत हे सर्व फलंदाज वेगवान धावा करू शकतात. त्याच बरोबर मार्कस स्टॉयनिसचा फॉर्म पाहता एक चांगला फिनिशर संघाला मिळाला आहे. वाचा- हैदराबाद समोर शंभर प्रश्न दिल्लीविरुद्धच्या सामन्यात अंतिम ११ जणांचा संघ निवडण्याचे आव्हान हैदराबादपुढे असणार आहे. डेव्हिड वॉर्नर आणि जॉनी बेयरस्टोनंतर तिसऱ्या क्रमांकावर मनीष पांडे येतो. पण त्यानंतर कोणी भरवश्याचा खेळाडू नाही. विजय शंकर गेल्या सामन्यात कंबर दुखीमुळे खेळू शकला नव्हता. त्याच्या जागी वृद्धीमान सहाला संधी दिलीहोती. पण कोलकाताविरुद्ध त्याने ३१ चेंडूत ३० धावा केल्या. असा असू शकतो संभाव्या संघ दिल्ली कॅपिटल्स: पृथ्वी शॉ, शिखर धवन, श्रेयस अय्यर (कर्णधार), ऋषब पंत (विकेटकीपर), शिमरॉन हेटमायर, मार्कस स्टॉयनिस, अक्षर पटेल, अमित मिश्रा, कगिसो रबाडा, आंद्रे र्त्जे, आवेश खान सनरायजर्स हैदराबाद: डेव्हिड वॉर्नर (कर्णधार), जॉनी बेयरस्टो (विकेटकिपर), मनीष पांडे, विजय शंकर, मोहम्मद नबी, अब्दुल समद, अभिषेक शर्मा, राशिद खान, भुवनेश्वर कुमार, संदीप शर्मा, खलील अहमद