ITBP जवानांनी घडवले मानवतेचे दर्शन; शव २५ किमीपर्यंत खांद्यावर नेले - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Wednesday, September 2, 2020

ITBP जवानांनी घडवले मानवतेचे दर्शन; शव २५ किमीपर्यंत खांद्यावर नेले

https://ift.tt/2QIPhuN
नवी दिल्ली: उत्तराखंडमध्ये () चीनव्याप्त तिबेट सीमेवरील चौकीवर तैनात असलेल्या भारत-तिबेट सीमा पोलिस दलाच्या (ITBP) जवानांनी एका मृत व्यक्तीचे शव खांद्यावर घेत २५ किलोमीटरवरील त्याच्या घरी पोहोचवले. या जवानांनी तब्बल ८ तासांचा दुर्गम भागातून पायी प्रवास केला. उत्तराखंडमधील पिथोरागड जिल्ह्यातील बुगदयार चौकीजवळील सीमेवरील स्युनी या गावातील एका स्थानिक ३० वर्षीय युवकाचा हा मृतदेह होता. या युवकाचे शव येथे पडलेले असल्याची माहिती आयटीबीपीच्या १४ व्या वाहिनीला मिळाल्यानंतर त्यांनी हे घडवले. ( personnel set an ) आयटीबीपीच्या जवानांना ही माहिती ३० ऑगस्ट, २०२० या दिवशी मिळाली. त्यानंतर आयटीबीपीच्या जवानांनी मृतदेहाला सरक्षित केले. त्या वेळी या भागात मुसळधार पाऊस कोसळत होता. तसेच या भागातील रस्ताही वाहनांसाठी पूर्णपणे बंद करण्यात आलेला होता. स्थानिक लोकांकडून मृत व्यक्तीबाबत माहिती मिळाल्यानंतर जवानांनी स्यूनी येथून सुमारे २५ किमीच्या अंतरावर असलेल्या मृत व्यक्तीच्या घरी स्ट्रेचरचा आधार घेत हे शव पोहोचवले. मुसळधार पावसामुळे हा रस्ता अतिशय खराब अवस्थेत आहे. मात्र जवानांनी अतिशय सावधगिरीने हा रस्ता कापला. ३० ऑगस्टला दुपारी शव घेऊन निघालेले जवान संध्याकाळी सुमारे साडे सात वाजता मृत व्यक्तीच्या घरी पोहोचले. एकूण ८ जवानांनी आळीपाळीने हे शव खांद्यावर घेत पायी रस्ता कापला. यानंतर बंगापनी गावात अंत्यसंस्कार करण्यात आले. क्लिक करा आणि वाचा- भारत-तिबेट सीमा पोलिस दलाच्या (ITBP) जवानांनी काही दिवसांपूर्वी पुरात फसलेल्या एका महिलेला सुरक्षित स्थळी हलवण्याचे काम केले होते. ही महिला पुराच्या पाण्यात अडकली होती. सततच्या मुसळधार पावसामुळे परिसरात दरडी देखील कोसळत होत्या. मात्र, कशाचीही पर्वा न करता भारत-तिबेट सीमा पोलिस दलाच्या जवानांनी पुढाकार घेत या महिलेला स्ट्रेचरवरून तब्बल १५ तास पायी चालत सुरक्षित स्थळी नेले होते. ही घटना उत्तराखंडमधील पिठोरगड जिल्ह्यातील मुन्सियारी येथील लाप्सा या गावातील आहे. क्लिक करा आणि वाचा- क्लिक करा आणि वाचा-