
लखनऊ : तब्बल २८ वर्षानंतर प्रकरणात विशेष न्यायालयात आज निर्णय सुनावला जाणार आहे. ६ डिसेंबर १९९२ रोजी बाबरी मशीद पाडण्यात आल्यानंतर फैजाबादमध्ये दोन एफआयआर दाखल करण्यात आल्या होत्या. यातील एक एफआयआर लाखो कारसेवकांविरोधात दाखल करण्यात आली होती तर दुसरी एफआयआर संघाच्या कार्यकर्त्यांसहीत , , , तत्कालीन शिवसेना नेते बाळ ठाकरे यांच्याविरोधात दाखल करण्यात आली होती. (अपडेट बातमी मिळवण्यासाठी पेज रिफ्रेश करा) LIVE अपडेट : - न्यायाधीश न्यायालयात दाखल झाले आहेत. याशिवाय चंपत राय, जय भगवान, साध्वी ऋतंभरा, विनय कटियार यांच्यासहीत अनेक आरोपी न्यायालयात दाखल होत आहेत - न्यायालयात एकूण १६ खुर्च्यांची व्यवस्था करण्यात आलीय. इतर लोक बाहेरच बसतील. - मुरली मनोहर जोशी, लालकृष्ण आडवाणी आणि उमा भारती व्हिडिओ कॉन्फरनसिंगद्वारे सुनावणीला हजेरी लावणार आहेत - न्यायाधीश न्यायालयात दाखल झाले आहेत. याशिवाय चंपत राय, जय भगवान, साध्वी ऋतंभरा, विनय कटियार यांच्यासहीत अनेक आरोपी न्यायालयात दाखल होत आहेत - आम्हाला विश्वास आहे की तिथे मंदिर होतं आणि मंदिर राहणार. आम्ही मशीद तोडली. रामलल्लासाठी तुरुंगात जाण्यास आणि फासावर चढायला तयार : रामविलास वेदांती - अयोध्येतही हायअलर्ट जारी करण्यात आलाय. डीआयजी दीपक कुमार यांनी दिलेल्या माहितीनुसार, सीआयडी, एलआययूच्या टीम साध्या वेषात तैनात करण्यात आल्या आहेत. - दुसरीकडे लखनऊच्या सीबीआय विशेष न्यायालयाच्या बाहेर जवळपास २००० पोलीस कर्मचारी तैनात करण्यात आलेत. याशिवाय राज्यातील २५ संवेदनशील जिल्ह्यात सुरक्षा व्यवस्था वाढवण्यात आलीय. - उत्तर प्रदेश पोलिसांना हायअलर्ट जारी करण्यात आलाय. लखनऊमध्ये सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आलीय - यापूर्वी न्यायाधीश यादव यांची निवृत्तीची वेळ आली असताना या प्रकरणाच्या सुनावणीसाठी त्यांना वेळ वाढवून देण्यात आला. त्यामुळे, या प्रकरणाची नव्यानं सुनावणी टळली होती - या प्रकरणात लालकृष्ण आडवाणी, मुरली मनोहर जोशी, उमा भारती, विनय कटीयार आणि साध्वी रितंभरा दोषी सिद्ध झाले तर त्यांना जास्तीत जास्त पाच वर्षांची शिक्षा सुनावली जाऊ शकते - तर न्यायालयानं उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री कल्याण सिंह, साक्षी महाराज आणि फिरोजाबादचे तत्कालीन डीएम आर एम श्रीवास्तव यांना दोषी ठरवलं तर त्यांना जास्तीत जास्त तीन वर्षांची शिक्षा होऊ शकते - या प्रकरणाची सुनावणी अतिरिक्त जिल्हा आणि सत्र न्यायालयाचे न्यायाधीश एस के यादव यांच्यासमोर पार पडतेय.