
मुंबई- दिवंगत अभिनेता सुशांतसिंह राजपूतच्या मृत्यू प्रकरणात ड्रग्ज अँगलचा तपास करणाऱ्या एनसीबीने आतापर्यंत अनेक धक्कादायक खुलासे केले आहेत. आज (२५ सप्टेंबर) अभिनेत्री रकुलप्रीत सिंगची चौकशी करण्यात येत असून उद्या २६ सप्टेंबर रोजी , सारा अली खान आणि श्रद्धा कपूर या तीन बड्या अभिनेत्रींची कसून चौकशी करण्यात येणार आहे. रणवीर सिंगने दीपिकासाठी मागितली खास परवानगी दीपिका पादुकोणला एनसीबीने चौकशीचा समन्स पाठवल्यानंतर काल संध्याकाळी दीपिका गोव्याहून मुंबईला परतली. यावेळी तिच्यासोबत तिचा नवरा रणवीर सिंगही होता. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, रणवीरने एनसीबीच्या अधिकाऱ्यांकडे चौकशी दरम्यान दीपिकाच्या बाजूला बसण्याची खास परवानगी मागितली आहे. त्याच्या या मागणीवर काय उत्तर देतं हे अजून कळू शकलेलं नाही. टाइम्स नाऊच्या वृत्तानुसार, एनसीबीची टीम दीपिका पादुकोणला ड्रग्जशी निगडीत प्रश्न विचारू शकते, २०१७ मध्ये हॅश- विडसाठी तू विचारलं होतं का ?, चॅटमध्ये 'माल' म्हणजे नक्की काय? तू करिश्मा प्रकाशकडून हॅश विकत घेतलं होतं का? या प्रश्नांची उत्तरं दीपिका काय देणार याकडे साऱ्यांचं लक्ष लागून राहिलेलं आहे. जया साहाच्या चौकशीत समोर आलं दीपिका पादुकोणचं नाव दरम्यान, सुशांतसिंह राजपूतची टॅलेन्ट मॅनेजर जया साहाच्या चौकशीत एनसीबीच्या हाती काही ड्रग चॅट लागले. यात दीपिका पादुकोणची मॅनेजर करिश्मा प्रकाश आणि दीपिकामधले काही ड्रग्ज चॅट सापडले. यात दीपिका करिश्माला माल आहे का विचारते. याचं करिश्माने होकारार्थी उत्तर दिलं होतं. आज होणार रकुलप्रीत सिंगची चौकशी आज रकुलप्रीत सिंगशिवाय दीपिका पादुकोणची मॅनेजर करिश्मा प्रकाश आणि धर्मा प्रोडक्शन्सचा दिग्दर्शक क्षितीज प्रसाद यांचीही चौकशी केली जाणार आहे. एनसीबी सुरुवातीला रकुलप्रीतची चौकशी करेल. तिची चौकशी गुरुवारीच होणार होती. पण रकुलप्रीतच्या टीमने, त्यांना समन्स मिळाला नसल्याचं सांगितलं होतं. त्यामुळे ती आता शुक्रवारी चौकशीसाठी पोहोचली. तर आज दुपारी दीपिकाची मॅनेजर करिश्माचीही विचारपूस केली जाणार आहे.