
नवी दिल्ली : काँग्रेसचे माजी अध्यक्ष यांनी एक व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करत यांच्यावर निशाणा साधलाय. पंतप्रधान नरेंद्र मोदींसाठी ८४०० रुपये खर्चुन आलीशान विमान मागवलं जात आहे आणि जवानांना विना बुलेटप्रुफ ट्रकांमधून शहीद होण्यासाठी सीमेवर पाठवलं जात आहे, असं त्यांनी या व्हिडिओसोबत म्हटलंय. सोशल मीडियावर हा व्हिडिओ व्हायरल झालेला दिसतोय. वाचा : वाचा : 'आपल्या जवानांना नॉन बुलेटप्रुफ ट्रकांमधून शहीद होण्यासाठी पाठवलं जात आहे आणि पंतप्रधानांसाठी ८४०० कोटी रुपयांचं विमान मागवलं जात आहे, हा न्याय आहे का?' असा सवाल राहुल गांधींनी विचारला आहे. आज (शनिवार) सोशल मीडियावर हा व्हिडिओ राहुल गांधी यांनी शेअर केलाय. या व्हिडिओत एका ट्रकमध्ये जवान बसलेले दिसत आहेत. ते एकमेकांशी बोलताना दिसत आहेत. यामध्ये एक जवान म्हणताना दिसतोय की, 'नॉन बुलेटप्रुफ गाड्यांमधून पाठवून आपल्या जीवासोबत खेळलं जातंय'. राहुल गांधी सतत चीन आणि भारत तणावाच्या पार्श्वभूमीवर जवानांना मिळणाऱ्या सुविधांना अधोरेखित करत आहेत, हा मुद्दा उचलून धरत आहेत. दोन दिवसांपूर्वीही राहुल गांधी यांनी 'पंतप्रधानांनी आपल्यासाठी ८४०० कोटी रुपयांचं विमान खरेदी केलं. एवढ्या पैशांत तर सियाचिन लडाख सीमेवर तैनात आपल्या जवानांसाठी कितीतरी गोष्टी खरेदी करता आल्या असत्या. गरम कपडे ३० लाख, जॅकेट-ग्लोव्ह्ज ६० लाख, बुटं ६७ लाख २० हजार, ऑक्सिजन सिलिंडर १६ लाख ८० हजार... पंतप्रधानांना केवळ स्वत:च्या प्रतिमेची काळजी आहे सैनिकांची नाही' असं ट्विट करत पंतप्रधानांवर आणि मोदी सरकारवर टीका केली होती. वाचा : वाचा :