
नवी दिल्ली: कृषी कायद्याबाबत (Farmer bill) मोदी सरकारविरोधात विरोधी पक्षांचे आंदोलन आता अधिक तीव्र होऊ लागले आहे. काँग्रेस पक्ष आजपासून पंजाबच्या मोगा जिल्ह्यातून 'खेती बचाओ' अभियान () सुरू करत आहे. काँग्रेसचे हे अभियान तीन दिवस सुरू राहणार असून या अभियानाचे नेतृत्व पक्षाचे माजी अध्यक्ष (Rahul Gandhi) करणार आहेत. ( to drive tractor in against ) खेती बचाओ अभियानादरम्यान राहुल गांधी स्वत: चालवणार आहेत. त्यावेळी ते गावातील शेतकऱ्यांना भेटणार आहेत. राहुल गांधींच्या या ट्रॅक्टर रॅलीत सुमारे तीन हजार शेतकरी भाग घेत असल्याचे सांगण्यात येत आहे. पंजाबच्या दौऱ्यावर असलेले राहुल गांधी तीन दिवस मोगा जिल्ह्यात मुक्काम करणार आहेत. रविवारी सकाळी ११ वाजता राहुल गांधी बधनीकला येथे एका सभेला संबोधित करतील. त्यानंतर स्वाक्षरी मोहीम सुरू करण्यात येणार आहे. नंतर राहुल गंदी कलान ते जटपुरापर्यंत ट्रॅक्टर रॅलीचे नेतृत्व करतील. शेतकरी राहुल गांधी यांचे लापोन आणि चकर गावात स्वागत करतील. या बरोबर आणखी एका कार्यक्रमाचे आयोजन मानोके गावात केले जाणार आहे. या अभियानाची समाप्ती लुधियानाच्या जटपुरा येथे सार्वजिक बैठकीद्वारे केली जाणार आहे. सोमवारी राहुल गांधी संगरूरमध्ये अशाच प्रकारे ट्रॅक्टर रॅली काढणार आहेत. तर, मंगळवारी ते पटियालामध्ये शेतकऱ्यांच्या मेळाव्यात सहभागी होतील. आपल्या दौऱ्याच्या शेवटी राहुल गांधी हरयाणा सीमेवर देखील ट्रॅक्टर रॅली काढणार आहेत. दरम्यान, राज्यात शेतकऱ्यांना कोणत्याही प्रकारचा मेळावा, रॅली किंवा कार्यक्रमाला अनुमती दिली जाणार नाही, असे हरयाणाचाचे गृहमंत्री अनिल विज यांनी यापूर्वीच इशारा दिला आहे. हे पाहता राहुल गांधी यांची ट्रॅक्टर रॅली होणार की नाही हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. क्लिक करा आणि वाचा- कृषी विधेयकाबाबत काँग्रेसची योजना रद्द व्हावे यासाठी सरकारने कायद्यावर विचार करावा असे काँग्रेसचे म्हणणे आहे. भारतीय राज्यघटनेच्या कलम २५४ (२) अंतर्गत आपली सत्ता असलेल्या राज्यांमध्ये हा कायदा मंजूर करण्याबाबतची शक्यता काय आहे याबाबत माहिती घेण्याच्या सूचना काँग्रेस अध्यक्षांनी केल्या आहेत. राज्यांच्या विधानसभांनी हा केंद्रीय कायदा रद्द करण्यासाठी कायदा करण्याची अनुमती दिल्यानंतर त्याला राष्ट्रपतींकडून मंजुरीची देखील आवश्यकता भासणार आहे. क्लिक करा आणि वाचा- क्लिक करा आणि वाचा-