'फ्रेंच नागरिकांची हत्या करण्याचा मुस्लिमांना अधिकार' - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Friday, October 30, 2020

'फ्रेंच नागरिकांची हत्या करण्याचा मुस्लिमांना अधिकार'

https://ift.tt/31RyRWM
क्वालांपूर: फ्रान्समधील नीस शहरात चर्चमध्ये झालेल्या तिघांच्या हत्येनंतर पूर्ण देशात रोष निर्माण झाला आहे. फ्रान्समधील घटनेवर जगभरात हळहळ व्यक्त होत असताना मलेशियाचे माजी पंतप्रधान बरळले आहे. नीस शहरातील हल्ल्याचे अप्रत्यक्षपणे समर्थन करताना त्यांनी मुस्लिमांना फ्रान्सच्या लाखो नागरिकांची हत्या करण्याचा अधिकार असल्याचे म्हटले आहे. त्यांच्या या वक्तव्यावर संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत. नीसमधील हल्ल्याचा उल्लेख न करता, महाथिर यांनी गुरुवारी 'इतरांचा आदर करा' या शीर्षकाने लिहिलेल्या ब्लॉग पोस्टमध्ये म्हटले की, मुस्लिमांना रागावण्याचा अधिकार आहे आणि भूतकाळात झालेल्या नरसंहारासाठी कोट्यवधी फ्रेंच नागरिकांची हत्या करण्याचा त्यांचा अधिकार आहे. मात्र, मुस्लिम अद्यापही सूड म्हणून डोळ्याच्या डोळा मागत नाहीत. मुस्लिम असे करतही नाही. फ्रान्सनेदेखील असे करता कामा नये असेही त्यांनी म्हटले. त्याऐवजी फ्रान्सने आपल्या नागरिकांना दुसऱ्यांच्या भावनांचा आदर करण्यास सांगितले पाहिजे. महाथिर यांनी आपल्या पोस्टमध्ये शाळेत शिक्षकाने प्रेषित पैगंबर यांचे व्यंगचित्र दाखवणाऱ्या सॅम्युअल पॅटी यांच्या हत्येच्या घटनेचा उल्लेख केला आहे. वाचा: वाचा: महाथिर यांनी फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांना उद्धट म्हटले आहे. मॅक्रॉनवर टीका करताना त्यांनी म्हटले की, कोणत्याही धर्माचा अवमान करणार्‍या शिक्षकाची हत्या केल्याबद्दल संपूर्ण इस्लामला दोष देणे योग्य नाही. मॅक्रॉन हे सभ्य व्यक्ती आहेत, असे वाटत नाही. संतापलेल्या व्यक्तीच्या चुकीबद्दल आपण सर्व मुस्लिमांना दोष देता आणि त्यांच्यावर दोषारोप करता तेव्हा, मुस्लिमांनाही फ्रेंच लोकांना शिक्षा करण्याचा अधिकार आहे. फ्रेंच वस्तूंवर बहिष्कार घालून त्यातून फारसं काही साध्य होणार नसल्याकडेही महाथिर यांनी लक्ष वेधले. वाचा: दरम्यान, चर्चमध्ये हल्ला करणाऱ्या हल्लेखोराला पकडण्यात पोलिसांना यश आले आहे. पोलिसांच्या कारवाईत हा हल्लेखोर जखमी झाला असून त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. हल्लेखोर हा ट्युनिशियाचा नागरिक असल्याचे तपासात समोर आले आहे. हल्लेखोर हातात कुरानची प्रत आणि चाकू घेऊन चर्चमध्ये शिरला आणि त्याने तिघांची हत्या केली. गेल्या दोन महिन्यांत फ्रान्समध्ये हा तिसरा हल्ला आहे.