नवी दिल्ली: (President Ramnath Kovind) यांचा आज ७५ वा . पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी () राष्ट्रपतींना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. राष्ट्रपतींनी उत्तम आरोग्य लाभो अशा सदिच्छाही पंतप्रधानांना व्यक्त केली आहे. राष्ट्रपती कोविंद यांचा जन्म १ ऑक्टोबर १९४५ ला उत्तर प्रदेशातील कानपूर जिल्ह्यातील एका गावात झाला. कोविंद हे २५ जुलै २०१७ रोजी देशाचे १४ वे राष्ट्रपती बनले. ( birthday) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विट करत राष्ट्रपतींना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. मोदी आपल्या ट्विटमध्ये म्हणतात, 'राष्ट्रपतींना त्यांच्या वाढदिवसानिमित्त शुभेच्छा. वंचितांप्रति त्यांचा सेवाभाव मोठा आहे. ईश्वर त्यांना दीर्घायुष्य आणि उत्तम आरोग्य देवो.' उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांनी देखील राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. रामनाथ कोविंद याच्या रुपाने देशाला एका अनुभवी नेत्याचे नेतृत्व लाभले आहे, असे म्हणत नायडू यांनी राष्ट्रपतींना उत्तम आरोग्य आणि सुख-समाधान मिळो अशा शुभेच्छा दिल्या आहेत. कोविंद यांचा असा झाला राजकारणात प्रवेश राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांचा राजकारणात सन १९९४ मध्ये प्रवेश झाला. त्यावेळी त्यांची उत्तर प्रदेशातून राज्यसभेवर नियुक्ती करण्यात आली होती. सन २००६ पर्यंत ते दोन वेळा राज्यसभेचे सदस्य राहिलेले आहेत. कोविंद हे व्यवसायाने वकील होते. त्यांनी दिल्ली हायकोर्ट आणि सुप्रीम कोर्टात वकिली केली आहे. कोविंद हे माजी पंतप्रधान मोरारजी देसाई यांचे खासगी सचिव देखील होते. भारतीय जनता पक्षाने त्यांची पक्षाच्या राष्ट्रीय प्रवक्तेपदी नियुक्तीही केली होती. ते भारतीय जनता पक्षाच्या दलित विभागाचे अध्यक्ष देखील होते. तसेच ते अखिल भारतीय कोली समाजाचे देखील अध्यक्ष राहिलेले आहेत.