नवी दिल्ली: आज (Mahatma Gandhi)आणि (Lal Bahadur Shastri) यांची जयंती. गांधीजींनी आम्हाला इंग्रजांविरुद्ध लढण्याचा मार्ग सांगितला, तर शास्त्री साधेपणाचे प्रतिक बनले. त्यांच्या जयंतीनिमित्त या दोन महान विभूतींचे आज संपूर्ण देश स्मरण करत आहे. (PM Narendra Modi) यांनी राजघाटावर (Raj Ghat)जात महात्मा गांधी यांना श्रद्धांजली अर्पण केली. त्यांनी महात्मा गांधींपुढे नतमस्तक होत त्यांच्या शिकवणीच्या स्मृती जागवल्या. त्यानंतर ते विजयघाट (Vijay Ghat) येथे पोहोचले. तेथे पंतप्रधानांनी शास्त्रींच्या समाधीस्थळावर श्रद्धांजली अर्पण केली. शास्त्रींचे दोन्ही पुत्र देखील त्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी विजयघाटावर पोहोचले. ( pays tribute to mahatma gandhi at and to at vijay ghat) महात्मा गांधी यांचे जीवन आणि त्यांच्या विचारांपासून शिकण्यासारखे बरेच काही आहे. बापूंचे विचार आम्हाला भारताला समृद्ध आणि करुणामय भारत निर्माण करण्याच्या दिशेने सतत मार्गदर्शन करत असतात, अशा शब्दांत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महात्मा गांधी यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे. गांधी जयंती निमित्त पंतप्रधान मोदींचा खास संदेश बापूंच्या समाधीवर पंतप्रधान मोदी झाले नतमस्तक लालबहादूर शास्त्री म्हणजे साधेपणाचे दुसरे नाव- पंतप्रधान नरेंद्र मोदी लालबहादूर शास्त्री हे विनयशील आणि कणखर होते. त्यांनी नेहमीच साधेपणा जपला आणि देशाच्या कल्याणासाठी आपले आयुष्य वाहिले. त्यांनी देशासाठी दिलेले योगदान आठवून आम्ही त्यांना त्यांच्या जयंतीदिनी कृतज्ञतापूर्वक स्मरण करतो, अशा शब्दांत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शास्त्रींना श्रद्धांजली अर्पण केली आहे. विजयघाटावर लालबहादूर शास्त्रींना पंतप्रधानांनी केले नमन राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी राजघाटावर जात महात्मा गांधी यांना श्रद्धांजली अर्पण केली क्लिक करा आणि वाचा- विजयघाट येथे लालबहादूर शास्त्री यांचे कुटुंबीय