मी गेल्यानंतर तरी कीव येईल; मराठा आरक्षणासाठी विद्यार्थ्याची आत्महत्या - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Thursday, October 1, 2020

मी गेल्यानंतर तरी कीव येईल; मराठा आरक्षणासाठी विद्यार्थ्याची आत्महत्या

https://ift.tt/3jldTGn
बीड: मराठा आरक्षणाला स्थगिती मिळाल्याने जिल्ह्यातील केतुरा येथील विद्यार्थ्यांने आत्महत्या केल्याची घटना बुधवारी घडली. कल्याण रहाडे असं या विद्यार्थ्याचं नाव आहे. त्याच्या आत्महत्येमुळं सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. विवेक हा बारावी पास होता. त्यानं अलीकडेच 'नीट'ची परीक्षा दिली होती. मराठा आरक्षणाला स्थगिती मिळाल्यामुळे तो निराश होता. या नैराश्यातूनच बुधवारी त्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. आत्महत्येपूर्वी त्यानं एक चिठ्ठी लिहून ठेवली आहे. 'मी विवेक कल्याण रहाडे एक कष्टकरी आणि गरीब शेतकऱ्याचा मुलगा आहे. मला जीवनात खूप मोठं होण्याची इच्छा आहे. मी आताच 'नीट' परीक्षा दिली आहे. गेल्याने माझा नंबर लागत नाही. माझ्या घरच्यांची मला प्रायव्हेटमध्ये शिकवण्याचीही ऐपत नाही. त्यामुळे मी माझं आयुष्य संपवत आहे. मी मेल्यानंतर तरी राज्य सरकार आणि केंद्र सरकार यांना मराठ्यांच्या मुलांची कीव येईल आणि माझे मरण सार्थक होईल,' असं त्यानं चिठ्ठीत म्हटलं आहे.