
नवी दिल्ली : काँग्रेस नेते यांच्याकडून थेट यांच्यावर हल्ला सुरू आहे. कृषी कायद्याविरोधात पंजाबमध्ये तीन दिवसीय '' पार पडल्यानंतर राहुल गांधी यांनी आपला मोर्चा हरयाणाकडे वळवला आहे. याच दरम्यान बुधवारी सकाळी त्यांनी ट्विटरवरून पुन्हा एकदा पंतप्रधानांवर टीका केलीय. 'एकटंच टनलमध्ये हात हलवणं सोडा आणि आपली चुप्पी तोडा. प्रश्नांचा सामना करा, देश तुम्हाला खूप काही विचारतोय' असं ट्विट राहुल गांधी यांनी केलंय. वाचा : वाचा : राहुल गांधी यांनी गेले तीन दिवस पंजाबमध्ये ट्रॅक्टर रॅली काढली होती. त्यानंतर ते मंगळवारी हरयाणाला पोहचलेत. इथे ते दो दिवस सभा घेणार आहेत. त्यानंतर दिल्लीत या 'शेती वाचवा यात्रे'चा शेवट होणार आहे. मंगळवारी एका पत्रकार परिषदेतही राहुल गांधी यांनी पंतप्रधानांवर हल्लाबोल केला होता. 'तीन कृषी कायद्यांद्वारे शेतकऱ्यांनाच संपवलं जातंय आणि मोठ्या उद्योगपतींसाठी मार्ग मोकळा केला जातोय. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनाही या तीन कायद्यांची व्यवस्थित जाणीव नाही' असा घणाघात राहुल यांनी केला. काँग्रेसकडून कृषी कायदा परत घेण्याची मागणी केली जातेय. देशातील वेगवेगळ्या भागांत कृषी कायद्याविरोधात आंदोलन सुरू आहे. लवकरच काँग्रेस पक्षाकडून आपल्या शासित राज्यांच्या विधानसभांमध्ये केंद्राकडून लागू करण्यात आलेल्या कायद्याविरोधात प्रस्ताव संमत केला जाऊ शकतो. पंजाबमध्ये मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंह यांनीही याचे संकेत दिले आहेत. वाचा : वाचा :