संतापजनक; हासरथ प्रकरणी भाजप नेत्याने केले लज्जास्पद वक्तव्य - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Wednesday, October 7, 2020

संतापजनक; हासरथ प्रकरणी भाजप नेत्याने केले लज्जास्पद वक्तव्य

https://ift.tt/34wdWZN
बाराबंकी: हाथरस प्रकरणी पीडितेबाबत उत्तर प्रदेशातील जिल्ह्यातील भारतीय जनता पक्षाच्या एका नेत्याने लज्जास्पद वक्तव्य केले आहे. दलित युवतीवर झालेल्या सामूहिक बलात्कार प्रकरणावर भाष्य करताना या भाजप नेत्याने आरोपी निर्दोष असल्याचे म्हटले आहे. अशा प्रकारच्या मुली या उसाच्या, भाताच्या, बाजरीच्या शेतीत, नाल्यांमध्ये आणि जंगलात मृतावस्थेत सापडत असतात. असे का?, कारण त्यांच्या मरणाच्या जागाच त्या असतात, असे आक्षेपार्ह वक्तव्य या भाजप नेत्याने केले आहे. हा भाजप नेता इतकेच बोलून थांबला नाही. आरोपी निर्दोष असून त्यांना सोडून दिले गेले पाहिजे, असेही हा नेता म्हणाला. पकडली गेलेले तरूण जर निर्दोष सिद्ध झाले, तर मग त्यांचे तुरुंगात गेलेले तारुण्य कोण परत देणार, असा सवालही त्यांनी विचारला. भाजप नेत्याचे हे वक्तव्य सोशल मीडियावर व्हायरल झाले आहे. लोकांनी हे ऐकताच या भाजप नेत्यावर टीकास्त्र सोडले आहे. राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षा रेखा शर्मा यांनी ट्विट करत हा नेता बुरसटलेल्या विचारांचा आणि मनोरुग्ण असल्याचे म्हटले आहे. हा नेता कोणत्याही पक्षाचा नेता म्हणवण्याच्या पात्रतेचा नाही आणि आपण त्याला नोटीस बजावत आहोत, असे शर्मा यांनी म्हटले आहे. या नेत्याचे नाव असे असून तो बाराबंकी येथील नगपालिकेचा अध्यक्ष आहे. भाजप नेत्याने नेमके काय म्हटले? सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या व्हिडिओमध्ये हा नेता म्हणतो, 'मुलीने मुलांना बाजरीच्या शेतात बोलावले असावे. कारण तो प्रेमप्रसंग होता. या सर्व गोष्टी सोशल मीडियावर देखील आहेत आणि चॅनेलवर देखील आहेत. या अशा प्रकारे जेवढ्या मुली मरतात, त्या सर्व काही जागांवरच सापडतात. या मुली उसाच्या शेतात सापडतात, तुरीच्या शेतात सापडतात, मक्याच्या शेतात सापडतात, बाजरीच्या शेतात सापडतात. त्या नाल्यांमध्ये सापडतात, झुडुपांमध्ये सापडतात. या मुली जंगलांमध्ये सापडतात.' क्लिक करा आणि वाचा- हा भाजप नेता पुढे म्हणाला, ' या मुली भाताच्या शेतातच मृतावस्थेत का सापडतात? त्या गव्हाच्या शेतात का सापडतात? यांच्या मरण्याची जागी तीच आहे आणि तेथे त्यांना ओढून नेले जात नाही. कोणीही त्यांना ओढून त्या ठिकाणी नेत नाही. तर मग अशा घटना अशाच जागांवर ता घडतात? हा देशपातळीवरील तपासाचा मुद्दा आहे. आता बाराबंकीमध्ये एका मुलाने मुलीसोबत आत्महत्या केली. मुलीला काहीही झाले नाही. आता जर मुलगी मेली असती तर संपूर्ण कुटुंबाला अटक केली असती. सांगण्याचा उद्देश हा आहे की, समाजाचे हे अतिशय मोठे पतन आहे आणि मुली जन्माला आल्याबरोबर त्यांना मारले जावे किंवा सती प्रथा पुन्हा लागू व्हावी अशीही स्थिती येऊ शकते असी मी समाजाला सांगू इच्छितो.' क्लिक करा आणि वाचा- क्लिक करा आणि वाचा-