
मुंबई- 'बिग बॉस' चाहत्यांची प्रतीक्षा अखेर संपली. बिग बॉसचा १४ वा सीझर आज ३ ऑक्टोबरपासून सुरू होत आहे. शनिवार आणि रविवारी त्याचा ग्रँड प्रीमिअर असेल. नेहमीप्रमाणे यंदाचा सीझनही सलमान खानच होस्ट करणार आहे. प्रत्येक सीझन हा आधीच्या सीझनपेक्षा जास्त रंजक असतो. हा सीझनही खूप सारं मनोरंजन करेल अशी अपेक्षा आहे. बिग बॉसचा हा सीझन करोनामध्येही देण्यात आलेल्या लक्झरी होममुळे चर्चेत आहे. बिग बॉसच्या घरात अशा अनेक सुविधा देण्यात आल्या आहेत, ज्या यापूर्वी कधीही देण्यात आल्या नव्हत्या. 'बिग बॉस १४' कधी आणि कुठे पाहावं 'बिग बॉस'चे चाहते ३ऑक्टोबरपासून १४ सीझन दररोज पाहू शकतात. आज त्याचा ग्रँड प्रीमिअर असेल. दररोज रात्री १०.३० वाजता कलर्स चॅनेलवर पाहता येईल. विकेण्डला हा रिअॅलिटी शो रात्री ९ वाजता पाहता येईल. जर रात्री पाहू शकलो नाही तर.. जर काही कारणास्तव रात्री 'बिग बॉस'चा भाग चुकला तर आपण दुसर्या दिवशी दुपारी १२ वाजता आणि मध्यरात्री १२ वाजताही पाहू शकता. पहिल्यांदा पाहू शकाल लाइव्ह ऑनलाइन यावेळी 'बिग बॉस १४' कलर्स चॅनेलवर प्रसारित होण्यापूर्वी ते वूट सिलेक्टवरही प्रेक्षक पाहू शकतात. त्यासाठी वूट सिलेक्ट सबस्क्राइब करणं आवश्यक आहे. टेलीकास्टच्याआधी वूट डॉट कॉमवर हे भाग देखील पाहता येईल. याऐवजी टेलिकास्ट झालेला एपिसोड दुसऱ्या दिवशी विनामूल्य तुम्ही वूटवर पाहू शकता. हे स्पर्धक दिसू शकतात बिग बॉस १४ मध्ये बिग बॉस मेकर्सनी आतापर्यंत कोणत्याही स्पर्धकांची नावं उघड केली नसली तर या सिझनमध्ये , जान कुमार सानू, पवित्रा पुनिया, निक्की तांबोळी, जास्मीन भसीन, राहुल वैद्य, निशांत मालकानी आणि ऐजाज खान यांची नावं निश्चिती झाली आहेत. त्याचबरोबर रबीना दिलैक आणि अभिनव शुक्ला यांच्याही नावांची चर्चा समोर येत आहे.