सुखी माणसाचा सदरा! राज ठाकरेंनी भरत जाधवसाठी केलं 'हे' ट्विट - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Saturday, October 3, 2020

सुखी माणसाचा सदरा! राज ठाकरेंनी भरत जाधवसाठी केलं 'हे' ट्विट

https://ift.tt/3l9v7Hw
मुंबईः मनसे अध्यक्ष यांचं मराठी सिनेमा आणि रंगभूमीवरील प्रेम सर्वश्रुत आहे. याआधीही अभिनेता सुबोध भावे याचा 'आणि डॉ. काशिनाथ घाणेकर' चित्रपटाचं त्यांनी कौतुक केलं होतं. त्यानंतर आज पुन्हा केदार शिंदेच्या नव्या मालिकेचं राज ठाकरे यांनी भरभरून कौतुक करत त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत. राज ठाकरे हे स्वतः कलाकार असून त्यांना असलेली कलेच्या आवडीबद्दल सारेच जण जाणतात. याआधीही त्यांनी अनेक चित्रपटांना भरभरून दाद दिली होती. त्याचबरोबर मुलाखतींमध्येही त्यांनी चित्रपटांबद्दल अनेकदा बोलून दाखवले होते. आपल्या ट्विटरवर राज ठाकरे यांनी दिग्दर्शक यांची नवी मालिका '' याचा प्रोमो शेअर करत त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत. तसंच, ही मालिका लोकांच्या चेहऱ्यावर हास्य आणेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला आहे. मालिकेबद्दल बोलताना आपल्या ट्विटमध्ये ते म्हणतात, 'करोनाचे सावट आणि त्यामुळं आलेलं आर्थिक संकट यामुळं सगळ्यांचाच आनंदच कुठेतरी हरवला आहे. केदार शिंदेच्या 'सुखी माणसाचा सदरा' या लॉकडाऊननंतरच्या पहिल्या नव्या दुरदर्शन मालिकेमधून ते सुख, तो आनंद सापडू दे, असं मनापासून वाटतंय,' असं राज ठाकरे म्हणाले आहेत. 'भरत जाधवला बऱ्याच वर्षांनी छोट्या पडद्यावर आलेलं पाहून छान वाटलं. या सगळ्या अस्वस्थ, अनिश्चिततेच्या वातावरणात तुमचा 'सुखी माणसाचा सदरा' रोज किमान अर्धा तासतरी मराठी मनांना या अनिश्चितेतून ब्रेक देईल आणि लोकांच्या चेहऱ्यावर हास्य आणेल आणि त्या आनंदात येणाऱ्या दिवसाला सामोरे जाण्याची ताकद मिळेल हे केदार, भरत तुम्ही नक्की पाहा,' असं म्हणत राज ठाकरे यांनी केदार शिंदे आणि यांच्यासह त्यांच्या टीमला शुभेच्छा दिल्या आहेत.