ट्रम्प म्हणतात, करोनाला घाबरू नका;रुग्णालयातून मिळाला डिस्चार्ज - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Tuesday, October 6, 2020

ट्रम्प म्हणतात, करोनाला घाबरू नका;रुग्णालयातून मिळाला डिस्चार्ज

https://ift.tt/30A7AHI
वॉशिंग्टन: करोनाची लागण झाल्यानंतर वॉल्टर रीड मेडिकल सेंटरमध्ये उपचार घेत असलेले अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प व्हाइट हाउसमध्ये परतले आहेत. रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाला असला तरी ट्रम्प यांच्यावर व्हाइट हाउसमध्ये उपचार सुरू असणार आहेत. डोनाल्ड ट्रम्प यांच्या पत्नी मेलेनिया ट्रम्प यांनाही करोनाची बाधा झाली आहे. त्यांच्यावरही उपचार सुरू आहेत. डोनाल्ड ट्रम्प यांना करोनाची लागण झाल्यानंतर रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. चार दिवस त्यांच्यावर उपचार सुरू होते. त्यांच्या प्रकृतीत सुधारणा दिसू लागली होती. ट्रम्प यांनी रुग्णालयातून एक व्हिडिओ संदेशही दिला होता. त्याशिवाय रविवारी त्यांनी रुग्णालयाबाहेर येत आपल्या समर्थकांना अभिवादनही केले होते. ट्रम्प यांना स्थानिक वेळ सायंकाळी ६.३० वाजण्याच्या सुमारास रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. ट्रम्प अद्यापही पूर्णपणे करोनाच्या संसर्गातून बरे झाले नाहीत. मात्र, प्रकृतीत सुधारणा दिसू लागल्यानंतर त्यांना व्हाइट हाउसमध्ये उपचार घेण्याची परवानगी देण्यात आली असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. ट्रम्प यांच्या ऑक्सिजनची पातळी सामान्य असून त्यांना रेमडेसिवीरचा पाचवा डोस आता व्हाइट हाउसमध्येच देण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले. वाचा: वाचा: राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी ट्विट करून म्हटले की, प्रकृती चांगली असून बरे वाटत आहे. करोनाच्या आजाराला घाबरण्याची आवश्यकता नाही. करोनावर आपल्या कार्यकाळात काही चांगली औषधे आणि माहिती नव्याने विकसित झाली आहे. मी २० वर्षापूर्वी जशी तब्येत होती, अगदी तसेच वाटत असल्याचेही त्यांनी सांगितले. वाचा: अमेरिकेत राष्ट्राध्यक्ष निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. येत्या ३ नोव्हेंबर रोजी अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक होणार आहे. राष्ट्राध्यक्ष निवडणुकपदासाठीची अध्यक्षीय वादविवादाची दुसरी फेरी १५ ऑक्टोबर रोजी होणार आहे. व्हाइट हाउसमध्ये उपचार घेऊन ट्रम्प १५ ऑक्टोबर रोजी मियामी येथे होणाऱ्या अध्यक्षीय वादविवादात सहभागी होणार असल्याची माहिती एका अधिकाऱ्याने दिली.