हाथरस पुन्हा हादरलं, बलात्कारानंतर सहा वर्षांच्या मुलीचा मृत्यू - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Tuesday, October 6, 2020

हाथरस पुन्हा हादरलं, बलात्कारानंतर सहा वर्षांच्या मुलीचा मृत्यू

https://ift.tt/2SvhzK2
हाथरस, उत्तर प्रदेश : गेल्या काही दिवसांपासून उत्तर प्रदेश राज्यातील हाथरस जिल्हा भलताच चर्चेत आलाय. हाथरसमध्ये उघडकीस आलेल्या सामूहिक बलात्कार आणि हत्या प्रकरणानंतर हे ठिकाण राजकारणाचंही केंद्रबिंदू ठरलं. पोलिसांकडून पीडित कुटुंबीयांना मिळालेल्या वागणुकीनंतर सामान्यांचंही लक्ष या प्रकरणानं वेधून घेतलं. या प्रकरणातील आक्रोश अजून क्षमलाही नाही तोवरच हाथरसमध्ये दुसरा बलात्कार झाल्याचं समोर येतंय. या प्रकरणातील पीडित मुलगी ही अवघ्या सहा वर्षांची चिमुरडी आहे. १५ दिवसांपूर्वी हाथरस जिल्ह्यातील सादाबाद भागाची रहिवासी असलेल्या सहा वर्षांच्या चिमुरडीवर बलात्कार झाल्याचं समोर आलं होतं. जिल्ह्यातील इगलास गावात बलात्काराची घटना घडली. पीडित मुलीवर दिल्लीतील एका रुग्णालयात उपचार सुरू होते. परंतु, उपचारादरम्यान या चिमुरडीनंही आपले प्राण सोडले. घटनेमुळे न्यायाची मागणी करत पीडित कुटुंबीयांनी मुलीच्या मृतदेहासहीत रस्त्यावर ठाण मांडलंय. घटना घडून १५ दिवस उलटले असले तरी अद्याप आरोपी पकडला गेलेला नाही. जेव्हापर्यंत आरोपी पकडला जात नाही आणि इगलास पोलीस अधिकाऱ्याला निलंबित केलं जात नाही तोपर्यंत मुलीच्या मृतदेहावर अंत्यसंस्कार करणार नसल्याची भूमिकाच कुटुंबीयांनी घेतलीय. कुटुंबीयांनी रस्त्यातच चक्का जाम आंदोलन सुरू केल्यामुळले इथे लगेचच मोठ्या संख्येनं पोलीस तैनात करण्यात आले. या प्रकरणात पोलिसांनी एका आरोपीला ताब्यात घेतलं असलं तरी पोलिसांनी खऱ्याखुऱ्या आरोपीवर कारवाई केलीच नसल्याचं कुटुंबीयांचं म्हणणं आहे. वाचा : वाचा : हाथरस आक्रोश दुसरीकडे, उत्तर प्रदेश सरकारनं हाथरसमधील 'निर्भया'च्या सामूहिक बलात्कार आणि खुनाच्या प्रकरणाची केंद्रीय अन्वेषण विभागामार्फत करण्याची घोषणा केली असली, तरी या चौकशीवर अनेक पक्षांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत. या प्रकरणाची चौकशी सर्वोच्च न्यायालयातील निवृत्त न्यायमूर्तींच्या देखरेखीखाली व्हावी, अशी मागणी पीडितेचा भाऊ, बहुजन समाज पक्ष आणि भीम आर्मी यांनी केली आहे. पीडितेच्या भावाला 'वाय' दर्जाची सुरक्षा पुरविण्याचीही मागणी 'भीम आर्मी'कडून करण्यात आलीय. पीडितेच्या भावाने हाथरसच्या जिल्हाधिकाऱ्यांना निलंबित करण्याचीही मागणी माध्यमांसमोर केली. तत्पूर्वी, राज्य सरकारने नेमलेल्या 'एसआयटी'नेही पीडितेच्या घरी जाऊन कुटुंबीयांचा जबाब नोंदवून घेतला. पीडितेचे वडील आजारी असल्यामुळे त्यांना वैद्यकीय मदत मिळण्याची शिफारस 'एसआयटी'नं केली होती. त्यानंतर, तातडीने पाडितेच्या घरी वैद्यकीय पथक पाठविण्यात आलं. जिल्हा पोलिस अधीक्षक विनीत जैस्वाल यांनीही गावात येऊन घटनास्थळाची पाहणी केली. वाचा : वाचा : वाचा :