
मुंबई: वंचिक बहुजन आघाडीचे नेते यांनी यांच्यावर पुन्हा एकदा निशाणा साधला आहे. हिमाचल प्रदेशातील उद्घाटन कार्यक्रमावरून आंबेडकर यांनी हे टीकास्त्र सोडले आहे. सुनसान असलेल्या अटल टनेलमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी कोणाला पाहून हात हलवत होते?, तेथे तर जनताच उपस्थित नव्हती, असे सांगत देशाला अनर्थाच्या मार्गावर लोटून देणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आरोग्यावर तर परिणाम होत नाही ना?, अशी टीका आंबेडकर यांनी केली आहे. आंबेडकरांनी अप्रत्यक्षपणे पंतप्रधानांच्या मानसिक आरोग्यासंबंधीचा मुद्दा उपस्थित करत जनतेला पंतप्रधानांच्या आरोग्याची माहिती मिळाली पाहिजे, असे म्हटले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा आदरणीय असा उपहासात्म उल्लेख करत त्यांनी यापूर्वी असा प्रकार अनेकदा केल्याचेही आंबेडकर म्हणाले. वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी यापूर्वीही अनेकदा पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्र सरकारवर जोरदार टीका केली आहे. विशेषत: हिंदुत्व आणि आरक्षणाच्या मुद्दयावरून त्यांनी नेहमीच पंतप्रधान मोदी यांना आपल्या टीकेचे लक्ष केले आहे. केंद्रातील मोदी सरकार हे मागासवर्गीांचे, तसेच दलितांचे आरक्षण संपवण्याचा डाव रचत असल्याची टीका प्रकाश आंबेडकर यांनी वेळोवेळी केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जगातील सर्वात मोठा बोगदा 'अटल बोगद्याचे' शनिवारी हिमाचल प्रदेशातील रोहतंग येथे उद्घाटन केले. या बोगद्यामुळे हिमाचल प्रदेशातील जनतेला तर मोठा फायदा होणार आहे. तसेच भारतीय लष्कराला रसद पुरवणे हे काम देखील सोपे होणार आहे. तसेच चीनकडील सीमेवर कोणत्याही ऋतुमध्ये पोहोचणे देखील आता सोपे होणार आहे, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी टनेलच्या उद्घाटनानंतर कार्यक्रमात संबोधित करताना म्हणाले. क्लिक करा आणि वाचा- अटल टनेल हा जगातील सर्वात मोठा टनेल ठरला आहे. अटल टनेलची लांबी ९.०२ किलोमीटर इतकी आहे. अटल टनेलमुळे मनाली आणि लेहदरम्यानचे अंतर ४६ किलोमीटरने अंतर कमी झाले आहे. या मुळे संपूर्ण प्रवासाचा वेळ चार ते पाच तासांनी कमी होणार आहे हे विशेष. हा बोगदा ९.०२ किलोमीटर लांबीचा आहे. या बोगद्यामुळे आता वर्षभर लाहोल स्पिती खोऱ्याशी संपर्क सुरू राहण्यास मदत होणार आहे. या पूर्वी हिमवर्षावामुळे या खोऱ्याचा संपर्क सहा महिन्यांसाठी तुटलेला असायचा. क्लिक करा आणि वाचा- क्लिक करा आणि वाचा-