
दुबई: आयपीएलच्या १३व्या हंगामात आज शनिवारी पहिली लढत आणि यांच्यात होणार आहे. प्ले ऑफमध्ये पोहोचण्यासाठी दिल्लीसाठी ही महत्त्वाची लढत आहे. तर मुंबईने याआधीच प्ले ऑफमधील स्थान पक्के केले आहे. तरी या सामन्यात विजय मिळून मुंबई पहिल्या स्थानावर राहण्याचा प्रयत्न करेल. वाचा- दिल्लीसाठी ही लढत महत्त्वाची आहे. जर या सामन्यात त्यांचा पराभव झाला तर पुढची बेंगळुरू विरुद्धची लढत त्यांच्यासाठी करो वा मरो अशी ठरले. आजच्या सामन्यात दिल्ली संघात एक बदल होण्याची शक्यता आहे. तर मुंबई संघात आज देखील नियमीत कर्णधार रोहित शर्मा खेळण्याची शक्यता नाही. मुंबई गेल्या सामन्यातील संघच कायम ठेवले. डावाची सुरूवात इशान किशन आणि क्विंटन डिकॉक हे दोघे करतील. मधळ्याफळीची जबाबदारी सूर्यकुमार यादव, हार्दिक पांड्या, सौरव तिवारी यांची असेल. त्यानंतर क्रुणाल पांड्या आणि कर्णधार कायरन पोलार्ड असतील. वाचा- गोलंदाजीत जसप्रित बुमराह, ट्रेंट बोल्ड सोबत जेम्स पॅटिसन चांगली कामगिरी करत आहेत. सोबत फिरकीपटू क्रुणाल पांड्या आणि राहुल चाहर हे देखील उत्तम गोलंदाजी करत आहेत. वाचा- दिल्लीकडून शिखर धवन सोबत अजिंक्य रहाणे पुन्हा एकदा सलामीला दिसू शकले. मधल्या फळीत श्रेयस अय्यर, ऋषभ पंत, शिमरोन हेटमायर त्यानंतर मार्कस स्टायनिस आणि अक्षर पटेल अशी फळी आहे. गोलंदाजीत कसिगो रबाडा, एनरिच नोर्जे यांच्या जोडीला मोहित शर्मा आहे. या सामन्यात तुषार देशपांडेला बाहेर बसवले जाऊ शकते. फिरकीपटूंमध्ये आर अश्विन आणि अक्षर पटेल यांच्यावर मदार असेल. वाचा-