... मग पेंग्विन गँगची पार्टी सुरु; नितेश राणेंची महाविकास आघाडीवर टीका - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Thursday, November 19, 2020

... मग पेंग्विन गँगची पार्टी सुरु; नितेश राणेंची महाविकास आघाडीवर टीका

https://ift.tt/32UcsbJ
मुंबई: राज्यातील वीज ग्राहकांना वाढीव वीज बिलात सवलत देण्याच्या आधीच्या आश्वासनावरून राज्य सरकारनं आता घूमजाव केलं आहे. यावरुन आता विरोधकांनी राज्य सरकारला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला आहे. भाजप नेते यांनीही महाविकास आघाडीवर निशाणा साधला आहे. महावितरणचे जसे वीज ग्राहक आहेत, त्याचप्रमाणे महावितरणही एक ग्राहक आहे. महावितरणला बाहेरून वीज विकत घ्यावी लागते. विविध प्रकारचे शुल्क द्यावे लागते. महावितरणची सध्याची थकबाकी ३१ टक्के आहे. ग्राहकांकडून देयके भरली जात नाहीत. त्यामुळं सवलत दिली जाणं अशक्य आहे. असं नितीन राऊत यांनी म्हटलं होतं. यावरुनच नितेश राणे आता आक्रमक झाले आहेत. या महाविकास आघाडी सरकारने नाइट लाइफ जास्तच मनावर घेतले आहे. असं दिसतेय. इतके हातात दिले की, कोणच भरणार नाही. मग काय अंधारच आंधार... आणि मग पेग्विंन गँगची पार्टी सुरु, असं खोचक ट्विट नितेश राणे यांनी केले आहे. नितीन राऊत यांचा भाजपवर निशाणा दरम्यान, भाजप नेत्यांकडून टीका होत असताना नितीन राऊत यांनी भाजप सरकारच्या काळात महावितरणची थकबाकी ५० हजार कोटींच्या जवळपास पोहोचली आहे, असा आरोप केला आहे. 'करोनामुळे महावितरणच्या आर्थिक स्थितीवर परिणाम झााला आहे. मात्र, महावितरणला सर्वात मोठा फटाका यापूर्वी सत्तेत असलेल्या भाजप सरकारने सरासरी कार्यक्षमता न दाखवल्यानं व वीज बिलांची वसुली न केल्यानं बसला आहे, असंही ते म्हणाले.