
दुबई: मुंबई इंडियन्सचा कर्णधार दुखापतीमुळे गेल्या काही सामन्यात खेळू शकला नाही. रोहितच्या गैरहजेरीत मुंबईने चांगली कामगिरी केली आहे. काल शनिवारी झालेल्या सामन्यात त्यांनी दिल्ली कॅपिटल्सवर ९ विकेटनी विजय मिळवत गुणतक्त्यात अव्वल स्थान भक्कम केले. या विजयानंतर मुंबईचा हंगामी कर्णधार कायरॉन पोलार्डने रोहित शर्मा कधी खेळणार याबाबत सांगितले. वाचा- दिल्ली कॅपिटल्सवर विजय मिळवल्यानंतर पोलार्डने रोहित शर्माच्या दुखापती संदर्भात अपडेट दिले. रोहितला हॅमस्ट्रिंगची दुखापत झाली आहे. पण तो लवकरच संघात येईल. किंग्ज इलेव्हन पंजाब विरुद्धच्या सामन्यात त्याला दुखापत झाली होती. त्यानंतर राष्ट्रीय निवड समितीने ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी देखील त्याचा विचार केला नव्हता. वाचा- काय म्हणाला पोलार्ड दिल्लीवर ९ विकेटनी विजय मिळवल्यानंतर पोलार्ड म्हणाला, रोहित आता फिट होत आहे आणि आशा आहे की तो लवकरच संघात येईल. आयपीएलच्या साखळी लढतीत मुंबईची अखेरची लढत सनरायजर्स हैदराबाद विरुद्ध होणार आहे. शनिवारी दिल्लीवरील विजयाने मुंबईसाठी हा सामना तसा फार महत्त्वाचा नाही. वाचा- रोहितला दुखापतीतून बाहेर येण्यासाठी मदत करणाऱ्या पथकातील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, रोहित प्ले ऑफच्या लढतीत खेळण्याची शक्यता अधिक आहे. मुंबईचे प्ले ऑफमधील पहिले स्थान निश्चित झाले आहे. त्यामुळे रोहितला विश्रांतीासाठी अधिक वेळ मिळणार आहे. वाचा- रोहितच्या गैरहजेरीत पोलार्डने चांगले नेतृत्व दिले आहे. हंगामी कर्णधार म्हणून पोलार्डने १७ पैकी १६ सामन्यात विजय मिळून दिला आहे. त्याच्या नेतृत्वावर संघ व्यवस्थापन देखील खुश आहे. पुढील दोन सामन्यात चांगली कामगिरी करून अंतिम फेरीत स्थान निश्चित करण्याचा आमचा प्रयत्न असेल. मुंबईने नेहमीच विषम संख्या असलेल्या वर्षात विजेतेपद मिळवले आहे. हे वर्ष आमच्यासाठी चांगले आहे, असे पोलार्ड म्हणाला.