अर्णब गोस्वामींना अटक; संजय राऊत म्हणाले... - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Wednesday, November 4, 2020

अर्णब गोस्वामींना अटक; संजय राऊत म्हणाले...

https://ift.tt/2TQOdGz
मुंबई: 'रिपब्लिक टीव्ही'चे संपादक यांच्या अटकेचे राजकीय पडसाद उमटू लागले आहेत. गोस्वामी यांच्या अटकेनंतर भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांनी राज्य सरकारवर निशाणा साधला आहे. तर, शिवसेनेचे खासदार यांनीही विरोधकांना प्रत्युत्तर दिलं आहे. () वाचा: 'महाराष्ट्रात कायद्याचं राज्य आहे. इथं कायद्यानुसार कारवाई केली जाते. एखाद्याच्या विरोधात पुरावे असतील तर पोलीस कारवाई करू शकतात,' असं संजय राऊत यांनी म्हटलं आहे. 'महाराष्ट्रात ठाकरे सरकारची स्थापना झाल्यापासून सूडभावनेने कुठलीही कारवाई करण्यात आलेली नाही,' असा दावाही त्यांनी केला. 'अन्वय नाईक आत्महत्या प्रकरणात मुंबई पोलिसांच्या हाती काही पुरावे लागले असतील. त्यामुळे पोलिसांनी ही कारवाई केली असेल. गोस्वामी यांनी गेल्या काही महिन्यात आपल्या चॅनेलवरून राज्य सरकारवर अनेक खोटे आरोप केले आहेत. त्या आरोपांचीही चौकशी पोलिसांनी करावी, अशी मागणीही राऊत यांनी केली आहे. वाचा: काय आहे प्रकरण? वास्तुविशारद अन्वय नाईक यांनी रिपब्लिक टीव्ही चॅनेलच्या स्टुडिओच्या इंटेरियर डिझाईनचे काम केले होते. त्यासाठी त्यांना अर्णब यांच्याकडून ५ कोटी ४० लाख रुपये येणे होते. परंतु वारंवार मागूनही गोस्वामी यांच्याकडून पैसे दिले जात नव्हते. त्यामुळे मानसिक तणावाखाली येऊन २०१८ साली अन्वय नाईक यांनी अलिबागजवळच्या कावीर गावात आत्महत्या केली होती. त्यानंतर त्यांच्या आईने देखील आत्महत्या केली. अर्णब गोस्वामी यांनी पैसे थकवल्यामुळं आलेल्या नैराश्यातून आत्महत्या करत असल्याचं नाईक यांनी आत्महत्यापूर्वी लिहिलेल्या पत्रात लिहिलं होतं. या प्रकरणी अन्वय नाईक यांच्या पत्नी अक्षता यांनी केलेल्या तक्रारीनंतर अलिबाग पोलिसांनी ३०६ कलमाअंतर्गत गुन्हा दाखल केला होता.