नवी दिल्ली: करोनाची (Coronavirus) लागण पुन्हा होऊ शकते हे नक्की आहे. हे म्हणणे आहे नीची आयोगाचे सदस्य () यांचे. काही लोकांमध्ये का होईना, मात्र एकदा होऊन गेल्यानंतर तो पुन्हा होऊ शकतो हे दिसले आहे, असे डॉ. पॉल म्हणाले. म्हणून काळजी घेणे सुरूच ठेवले पाहिजे असे ते म्हणाले. परिस्थिती पाहता, आजही देशाच्या ८० टक्के लोकांना करोनाची लागण होण्याचा धोका आहे. () येणार हे नक्की, मात्र याचा अर्थ आपण निष्काळजी व्हावे असा नाही. लस ही केवळ एक शस्त्र आहे. आम्हाला करोनाबाबतचे सर्व नियम आणि सूचनांचे पालन करतच राहावे लागेल, असे डॉ. पॉल म्हणाले. (ovid 19 can be reinfected so needs continue precaution says doctor paul) दिल्लीत करोना संसर्गाने शिखर गाठल्याचेही ते प्रसारमाध्यमांशी बोलताना म्हणाले. ही परिस्थिती पाहता लोकांनी व्यक्तिगत स्तरावर समजून घेतले पाहिजे. आम्हाला चाचणी आणि आयसोलेशनचे उपाय करावेच लागणार आहेत. आता सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे संसर्ग झालेल्या व्यक्तीच्या संपर्कात आलेल्या १५ ते २० जणांना विलगीकरणात ठेवणे ही आहे. कारण वेसाबध राहिल्यास संसर्ग पसरू शकतो, असे डॉ. पॉल म्हणाले. क्लिक करा आणि वाचा- '२ दिवसांपूर्वी संपर्कात आलेलया सर्वांना आयसोलेशनमध्ये ठेवणे गरजेचे' ज्या व्यक्तीला करोनाची लागण झाली आहे, त्या व्यक्तीच्या दोन दिवस आधीपासून संपर्कात आलेल्या सर्वांना आयसोलेशनमध्ये ठेवणे आवश्यक असल्याचे डॉ. पॉल म्हणाले. रुग्णाच्या संपर्कात आलेल्या या लोकांना ७ दिवस तरी क्वारंटीन राहायला हवे. यामुळे त्यांच्यामुळे त्यांचे कुटुंबीय किंवा इतरांना संसर्ग होणार नाही. त्यानंतर त्यांनी आपली चाचणी करावी, असे डॉ. पॉल पुढे म्हणाले. क्लिक करा आणि वाचा- क्लिक करा आणि वाचा-