Drugs Connection: भारती सिंगच्या घरी NCBचा छापा, सुरू कसून चौकशी - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Saturday, November 21, 2020

Drugs Connection: भारती सिंगच्या घरी NCBचा छापा, सुरू कसून चौकशी

https://ift.tt/3lUZ7HN
मुंबई- प्रकरणात ड्रग्ज प्रकरणाचा तपास बऱ्याच काळापासून सुरू आहे. आता या प्रकरणात कॉमेडियन आणि तिचा नवरा हर्षवर्धन लिंबाचिया यांचं नाव समोर आलं आहे. एएनआयने ट्वीट करत यासंबंधीची माहिती दिली. या ट्वीटमध्ये स्पष्टपणे लिहिण्यात आलं की, 'मुंबईत कॉमेडियन भारती सिंगच्या घरी नारकोटिक्स कन्ट्रोल ब्यूरोने छापा टाकला आहे.' एनसीबीची टीम आता भारती सिंग आणि तिचा नवरा यांच्या मुंबईच्या घरी चौकशीसाठी पोहोचली आहे. बॉलिवूडमध्ये ड्रग्जच्या तपासात आतापर्यंत अनेक सेलिब्रिटींची नावं समोर आली आहेत. यात सुशांतची मैत्रीण रिया चक्रवर्तीसह दीपिका पादुकोण, सारा अली खान, रकुलप्रीत सिंग, अर्जुन रामपालची गर्लफ्रेण्ड गॅब्रिएला डेमेट्रिएड्स यांसारख्याची नावं समोर आली आहेत. १४ जून रोजी सुशांतसिंह राजपूतच्या निधनानंतर एनसीबीने मादक पदार्थांशी निगडीत व्हॉट्सअॅप चॅटच्या खुलाशानंतर यासंबंधीची चौकशी सुरू केली. यात एनसीबीने सर्वातआधी सुशांतची गर्लफ्रेण्ड रिया चक्रवर्ती आणि तिचा भाऊ शौविक चक्रवर्ती आणि सुशांतचे कर्मचारी यांना ताब्यात घेतलं. दीर्घकाळ चौकशी केल्यानंतर त्यांना अटक करून तुरुंगातही ठेवण्यात आलं. सध्या रियासह काही आरोपी जामिनावर सुटले आहेत.