
भोपाळ : मध्य प्रदेश विधानसभा पोटनिवडणुकीत २८ जागांसाठी आज मतदान पार पडत आहे. करोना संक्रमणाच्या पार्श्वभूमीवर आज सकाळी ७.०० वाजल्यापासून सुरु झालेलं मतदान सायंकाळी ६.०० वाजेपर्यंत पार पडेल. प्रशासनाकडून यासाठी संपूर्ण तयारी करण्यात आलीय. मध्य प्रदेशच्या इतिहासात पहिल्यांदाच एवढ्या मोठ्या संख्येत विधानसभा जागांवर फेरनिवडणूक पार पडतेय. १० नोव्हेंबर रोजी या निवडणुकांचे निकाल जाहीर होणार आहेत. राज्यात कोणत्या पक्षाचं वर्चस्व आणि सत्ता राहील, याचा निकाल या निवडणुकीत लागणार आहे. या उपनिवडणुकीत काँग्रेसचा राजीनामा देत भाजपच्या गोटात शिरलेल्या २५ आमदारांची प्रतिष्ठाही या निवडणुकीत पणाला लागलीय. विधानसभा निवडणुकीत ज्या जागांवर ते काँग्रेसच्या तिकिटावर निवडून आले त्याच जागांवर आता पोटनिवडणुकीत भाजपच्या तिकिटावर हे उमेदवार उभे आहेत. यातील बहुतांश ज्योतिरादित्य शिंदे यांचे समर्थक आहेत, आणि त्यांच्याचसोबत ते भाजपमध्ये दाखल झालेले आहेत. ज्योतिरादित्य शिंदे याच वर्षी मार्च महिन्यात भाजपमध्ये सामील झाले होते. वाचा : वाचा : मध्य प्रदेशात काँग्रेसच्या २२ आमदारांनी राजीनामा देत भाजपचा मार्ग पत्करल्यानं सरकार अल्पमतात आलं होतं. त्यामुळे २० मार्च रोजी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला होता. २३ मार्च रोजी यांच्या नेतृत्वाखाली भाजपनं राज्यात सत्ता स्थापन केली होती. त्यानंतर काँग्रेसच्या आणखीन चार आमदारांनी राजीनामा देत भाजपची वाट धरली होती. उल्लेखनीय म्हणजे, आज (मंगळवारी) देशातील १० राज्यांच्या ५४ विधानसभा मतदारसंघांत पोटनिवडणूक पार पडतेय. यातील २८ मतदारसंघ मध्य प्रदेशातील आहेत. वाचा : वाचा :