पिकाला पाणी देण्यासाठी गेलेल्या तीन भावांचा विहिरीत पडून मृत्यू - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Thursday, November 19, 2020

पिकाला पाणी देण्यासाठी गेलेल्या तीन भावांचा विहिरीत पडून मृत्यू

https://ift.tt/3lLgDyd
। म. टा. प्रतिनिधी तालुक्यातील येथील तीन सख्ख्या भावांचा पिकाला पाणी देण्यासाठी गेलेल्या विहिरीत पडून मृत्यू झाला आहे. एकाचा तीन महिन्यापूर्वीच विवाह झाला होता. पाळसखेड पिंपळे येथील ज्ञानेश्वर आप्पासाहेब जाधव (वय २६), रामेश्वर आप्पासाहेब जाधव (वय २६) व सुनील आप्पासाहेब जाधव (वय १८) हे तिघे भाऊ १८ नोव्हेंबर रोजी रात्री ८ वाजता जेवण करून शेतात गव्हाच्या पिकाला पाणी देण्यासाठी दोन दुचाकी घेऊन गेले होते. एक जण विद्युत पंप सुरू करत असताना त्याला करंट लागले व तो विहिरीत पडला. त्याला वाचविण्यासाठी दोघांनी विहिरीत उडी मारली. मात्र, अंधार असल्याने या तिन्ही भावांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. हे तिघे घरी आले नाहीत म्हणून त्यांचे आई-वडील व धानेश्वरची पत्नी चिंतेत होती. शिवाय मोबाईल फोन कोणीही उचलत नव्हते म्हणून त्यांनी नातेवाईकांना सांगितले. त्यानंतर रात्री २ ते ३ च्या दरम्यान ते विहिरीत पडल्याचे लक्षात आले. या घटनेची माहिती मिळताच हसनाबाद पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष घोडके यांनी घटनास्थळी भेट दिली व पंचनामा केला. तीन महिन्यापूर्वीच झाला होता धानेश्वरचा विवाह आप्पासाहेब जाधव यांना तीन मुले आहेत. त्यापैकी ज्ञानेश्वरचा तीन महिन्यापूर्वीच विवाह झाला होता तर इतर दोन मुलगे औरंगाबाद येथे कंपनीत कामाला होते. लाकडाऊनमध्ये ते घरी आले होते. आणखी वाचा: