
सोलापूर: शिवसेनेचे आमदार यांच्या घरावर व कार्यालयावर ईडीने (ED) टाकलेल्या छाप्यांबाबत राज्याचे विरोधी पक्षनेते यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे. 'कुणीतरी तक्रार केल्याशिवाय किंवा काहीतरी मटेरियल असल्याशिवाय कोणावरही धाड टाकत नाही. ईडीकडे नक्कीच काहीतरी पुरावे असतील,' असं फडणवीस म्हणाले. ( on Raids at Home and offices) पदवीधर व शिक्षक मतदारसंघाच्या निवडणूक प्रचाराच्या निमित्तानं सोलापूरमध्ये आले असता ते पत्रकार परिषदेत बोलत होते. सरनाईक यांच्या घरावर ईडीनं टाकलेल्या छाप्याबाबत त्यांना विचारलं असता ते म्हणाले, 'या संपूर्ण घडामोडींचा तपशील माझ्याकडं नाही. त्यामुळं मी त्यावर फारसं काही बोलणार नाही. मात्र, माझ्या माहितीनुसार, ईडी कुणावरही पुराव्याशिवाय छापा टाकत नाही. त्यांनी तशी कारवाई केली असेल तर नक्कीच त्यांच्याकडे काही तक्रारी किंवा मटेरियल असेल.' वाचा: 'एखाद्यानं चूक केली नसेल तर त्याला ईडीच्या छाप्याला घाबरण्यांचं काही कारण नाही. चूक झाली असेल तर कारवाई होईलच,' असंही ते म्हणाले. भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांनी सरनाईक यांच्यावरील कारवाईचं जोरदार स्वागत केलं आहे. 'प्रताप सरनाईक यांच्याबद्दल मी असं अनेकदा ऐकलं होतं. त्यांचे मुखिया देखील असेच उद्योग करतात,' असा थेट आरोपही सोमय्या यांनी उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्यावर केला आहे. वाचा: