भारताची 'रॉ' आमच्यावर हल्ला करणार!; पाकिस्तानी मंत्र्याची भीती - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Tuesday, November 17, 2020

भारताची 'रॉ' आमच्यावर हल्ला करणार!; पाकिस्तानी मंत्र्याची भीती

https://ift.tt/3nuxhSZ
इस्‍लामाबाद: भारतीय गुप्तचर संस्था 'रॉ' पाकिस्तानमध्ये दहशतवाद पसरवत असल्याचा आरोप पाकिस्तानी लष्कराकडून करण्यात आल्यानंतर आता पाकिस्तानी मंत्र्यांवर रॉ हल्ला करणार असल्याची भीती पाकिस्तानी मंत्र्यांनी व्यक्त केली आहे. त्यामुळे रॉ ने पाकिस्तानी नेत्यांच्या मनात धडकी भरवली असल्याची चर्चा सुरू आहे. पाकिस्‍तानचे रेल्वेमंत्री शेख रशीद यांनी पाकमधील नेत्यांवर हल्ला होण्याची भीती व्यक्त केली आहे. भारतीय गुप्तचर संस्था रॉ ने पाकिस्तानमधील नेत्यांची 'हिटलिस्ट' तयार केल्याचा अजब दावा त्यांनी केला आहे. त्यामुळे पाकिस्तानातील प्रत्येक नेत्याने आपापली सुरक्षेची व्यवस्था करावी असे आवाहन त्यांनी केले आहे. आपल्यावरही तीनदा हल्ला झाल्याचा आरोप त्यांनी केला आहे. त्यामुळे पाकिस्तानातील नेत्यांना सध्या रॉ नावाच्या गुप्तचर संस्थेने धडकी भरविली आहे. वाचा: वाचा: रशीद म्हणाले, रॉ पाकिस्तानातील मोठ्या नेत्यांना कोणत्याही क्षणी नुकसान पोहोचवू शकते. दरम्यान पाकिस्तानचे विदेश मंत्री शाह महमूद कुरेशी आणि लष्कराच्या प्रवक्त्यांनी भारतावर बलुचिस्तानमध्ये दहशतवादी कारावाया सुरू केल्याचा आरोप केला आहे. भारताचे पंतप्रधान मोदी हे सगळ्यात खतरनाक व्यक्ती आहे. त्यांच्या इशाऱ्यावर भारतीय गुप्तचर संस्था चीन आणि पाकिस्तानचा आर्थिक कॉरीडोर उद्ध्वस्त करण्याचे प्रयत्न करीत असल्याचा आरोपही कुरेशी यांनी केला. भारताने यासाठी सुमारे ८० अरब रुपयांची रक्कम मोजल्याचेही त्यांनी नमूद केले. भारताने पाकिस्तावर हल्ले करण्यासाठी सुमारे ७०० लोकांची फौजच तयार केल्याचे कुरेशी बरळले. त्यामुळे पाकिस्तानी जनतेने त्यांना चांगलेच धारेवर धरले आहे. वाचा: सोशल मीडियावर या दोन्ही मंत्र्यांना 'डरपोक' संबोधण्यात येत आहे. भारतावर आरोप करताना कोणते पुरावे आहेत का, असा प्रतिप्रश्नच पाकिस्तानमधील अनेक नागरिकांनी या दोन्ही नेत्यांना सोशल माध्यमांवर केला आहे. त्यामुळे अलीकडच्या काळात पाकिस्तानात इमरान खाननंतर रेल्वेमंत्री रेख रशीद व विदेश मंत्री महमूद कुरेशी सर्वाधिक ट्रोल होत आहेत. नागरिकांनी त्यांच्यावर मिम्सही तयार केले आहेत.