दिल्लीत २ संशयित दहशतवादी अटकेत; महत्वाच्या ठिकाणांवर घातपाताची होती योजना - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Tuesday, November 17, 2020

दिल्लीत २ संशयित दहशतवादी अटकेत; महत्वाच्या ठिकाणांवर घातपाताची होती योजना

https://ift.tt/3lJKvLu
नवी दिल्ली: राजधानी दिल्लीतील (Delhi) सराय काले खां परिसरातून दोन संशयित दहशतवाद्यांना पकडण्यात आले आहे. दिल्ली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सोमवारी रात्री सुमारे सव्वा १० वाजता मिलेनियम पार्क येथून अटक केली. हे येथे येणार असल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी पाळत ठेवली. हे दोन्ही संशयित दहशतवादी जम्मू आणि काश्मीरचे रहिवासी आहेत. पोलिसांनी या दोन दहशतवाद्यांकडून दोन सेमी-ऑटोमॅटिक पिस्तुल आणि १० जिवंत काडतूसे जप्त केली आहेत. दिल्ली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पकडण्यात आलेल्या संशयितांपैकी एक बारमुल्ला जिल्ह्यातील डोरू गावात राहणाऱ्या अब्दुल लतीफ (उम्र-२२ वर्षे) हा आहे. २० वर्षीय दुसऱ्या संशयिताचे नाव अशरफ खटाना असे आहे. तो कुपवाडा येथील हटमुल्ला गावचा रहिवासी आहे. याच महिन्यात जारी झाला अलर्ट नोव्हेंबर महिन्याच्या सुरुवातीला दिल्ली-एनसीआरसह देशातील मोठ्या महानगरांमध्ये दहशवादी हल्ल्याचा धोका असल्याचे जाहीर केले आहे. गुप्तचर संस्थांनी आंतरराष्ट्रीय दहशतवादी कारवायांना पाहत अलर्ट जारी केला होता. क्लिक करा आणि वाचा- या माहितीनुसार, हे दहशतवादी परदेशी नागरिकांचा राबता असलेले भाग, नवी दिल्लीतील परिसरात परदेशी दूतावास, चर्च आणि इतर धार्मिक स्थळे, मोठी हॉटेलांसह महत्वपूर्ण इमारतींपैकी कोणत्याही इमारतींवर मोठा दहशतवादी हल्ला करण्याच्या तयारीत आहेत. ही माहिती मिळाल्यानंतर दिल्लीत सुरक्षा आणखी कडक केली गेली होती. क्लिक करा आणि वाचा- क्लिक करा आणि वाचा-