करोना: गेल्या ४ महिन्यांत आज सर्वात कमी रुग्णवाढ, मृत्यू ४३५ - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Monday, November 16, 2020

करोना: गेल्या ४ महिन्यांत आज सर्वात कमी रुग्णवाढ, मृत्यू ४३५

https://ift.tt/3psU7fT
नवी दिल्ली: देशात सोमवारी १६ नोव्हेंबर या दिवशी गेल्या २४ तासांत करोनाच्या ३० हजार ५४८ नव्या रुग्णांची नोंद करण्यात आली. ही संख्या गेल्या ४ महिन्यांमधील एका दिवसात नोंद झालेली सर्वात कमी संख्या आहे. या पूर्वी १५ जुलैला २९ हजार ४२९ नवे वाढले होते. आज १६ नोव्हेंबरच्या सकाळपर्यंत या नव्या रुग्णवाढीबरोबरच आतापर्यंत एकूण ८८ लाख ४५ हजार १२७ जणांचा करोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे. गेल्या २४ तासांमध्ये ४३५ लोकांचा मृत्यू झाला आहे. करोनामुळे आतापर्यंत झालेल्या मृत्यूची संख्या १ लाख ३० हजार ७० इतकी आहे. देशात करोनाचा मृत्यूदर १.४७ टक्के इतका आहे. (india registered lowest corona patients in last 24 hours) देशात रुग्ण बरे होण्याचा दर ९३.२६ टक्क्यांवर रुग्ण बरे होण्याबाबत बोलायचे झाल्यास गेल्या २४ तासांमध्ये ४३ हजार ८५१ रुग्ण बरे झाले आहेत. देशातील करोनाचा रुग्ण बरे होण्याचा दर ९३.२६ टक्के इतका आहे. आतापर्यंत या साथीच्या आजाराने ८२ लाख ४९ हजार ५७९ इतके रुग्ण बरे झाले आहेत. सध्या देशात ज्यांच्यावर उपचार सुरू आहेत असे सक्रिय रुग्ण एकूण ५.२६ टक्के, म्हणजेच ४ लाख ६५ हजार ४७८ इतकी आहे. क्लिक करा आणि वाचा- आतापर्यंत झाल्या १२,५६,९८,५२५ चाचण्या देशात करोनाचा पॉझिटीव्हीटीचा दर सध्या ३.५४ टक्के इतका आहे. गेल्या २४ तासांमध्ये एकूण ८ लाख ६१ हजार ७०६ चाचण्या करण्यात आल्या. देशात आतापर्यंत झालेल्या एकूण चाचण्यांची संख्या १२ कोटी ५६ लाख ९८ हजार ५२५ इतकी आहे. क्लिक करा आणि वाचा- क्लिक करा आणि वाचा-