दिवाळीत 'या' शहरांनी तोडले प्रदूषणाचे रेकॉर्ड, दिल्ली व्हेन्टीलेटरवर - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Monday, November 16, 2020

दिवाळीत 'या' शहरांनी तोडले प्रदूषणाचे रेकॉर्ड, दिल्ली व्हेन्टीलेटरवर

https://ift.tt/3f4OAqJ
नवी : करोना काळातच प्रदूषणामुळे गंभीर परिणाम सहन कराव्या लागणाऱ्या राजधानी दिल्ली आणि आजुबाजुच्या परिसरात दिवाळीच्या दिवासांत प्रदूषणात आणखीनच वाढ झाल्याचं दिसून येतंय. सरकारी सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, (NCR) मध्ये गाझियाबाद, नोएडा, ग्रेटर नोएडा, फरीदाबाद आणि गुडगाव या भागांत रविवारी वायू गुणवत्ता 'गंभीर' श्रेणीमध्ये नोंदविण्यात आली. केंद्रीय नियंत्रण बोर्डाद्वारे (CPCB) उपलब्ध करण्यात आलेल्या वायू गुणवत्ता निर्देशांकानुसार, दिल्लीच्या आजुबाजुच्या पाच शहरांत हवेत प्रदूषण निर्माण करणारे तत्व पीएम २.५ आणि पीएम १० च्या प्रमाणात लक्षणीय वाढ झालीय. वायू गुणवत्ता निर्देशांक निर्देशांकानुसार, ० - ५० पर्यंत वायू गुणवत्ता निर्देशांक 'उत्तम', ५१ - १०० पर्यंत 'समाधानकारक', १०१ - २०० पर्यंत 'मध्यम', २०१ - ३०० दरम्यान 'वाईट', ३०१ - ४०० दरम्यान 'अतिशय वाईट', ४०१ - ५०० दरम्यान 'गंभीर' मानला जातो. दिल्ली - एनसीआर भागातील निर्देशांक केंद्रीय प्रदूषण नियंत्रण बोर्डानुसार, रविवारी सायंकाळी ४.०० वाजता मागच्या २४ तासांत सरासरी वायू गुणवत्ता निर्देशांकाची नोंद पुढीलप्रमाणे करण्यात आली. गाझियाबाद - ४४८ नोएडा - ४४१ ग्रेटर नोएडा - ४१७ गुडगाव - ४२५ फरीदाबाद - ४१४ वाचा : वाचा : चंदीगडमध्ये गेल्या ५० वर्षांचा रेकॉर्ड तुटला चंदीगडमध्ये यंदाच्या दिवाळीत सर्वात कमी प्रदूषणाचा स्तराची नोंद करण्यात आली. यंदा गेल्या ५० वर्षांतील सर्वात कमी प्रदूषणाची नोंद करण्यात आलीय. चंदीगडमध्ये प्रशासनाकडून दिवाळीत फटाके विक्री आणि फटाके फोडण्यावर बंदी घालण्यात आली होती. मुंबईत ध्वनी प्रदूषणानं तोडला १५ वर्षांचा रेकॉर्ड दुसरीकडे, आर्थिक राजधानी मुंबईत मात्र यंदाच्या दिवाळी दरम्यान ध्वनी प्रदूषणात गेल्या १५ वर्षांतली रेकॉर्डब्रेक घट नोंदविण्यात आलीय. एका सामाजिक संस्था असलेल्या आवाज फाऊंडेशननं ही माहिती दिलीय. शनिवारी रात्री ८.०० वाजपल्यापासून १०.०० वाजेपर्यंत आणि त्यानंतर रविवारी सकाळपर्यंत नोंदवण्यात आलं. मुंबईत २०१९ साली सर्वोच्च ध्वनी प्रदूषणाची नोंद करण्यात आली होती. वाचा : वाचा :