
व्हिएन्ना: ऑस्ट्रियाची राजधानी व्हिएन्नात झालेल्या दहशतवादी हल्ल्याप्रकरणी मोठा खुलासा झाला आहे. या हल्ल्याची जबाबदारी इस्लामिक स्टेटने (आयएस) घेतली आहे. व्हिएन्नामध्ये भररस्त्यात अंदाधुंद गोळीबार करण्यात आला. यामध्ये चौघांचा मृत्यू झाला. तर, १७ जण जखमी झाले. पोलिसांच्या कारवाईत हल्लेखोरही ठार झाला. रॉयटर्स या वृत्तसंस्थेने दिलेल्या वृत्तानुसार, इस्लामिक स्टेटने मंगळवारी झालेल्या येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याची जबाबदारी आयएसने घेतली आहे. आयएन 'अमाक' या वृत्तसंस्थेद्वारे हा हल्ला आम्हीच केला असल्याची कबुली आयएसने दिली आहे. त्याशिवाय त्यांनी बंदुकधारी व्यक्तीचा फोटो आणि व्हिडिओ जारी केला आहे. वाचा: टेलिग्रामवर जारी झालेल्या फोटोमध्ये दहशतवाद्याची ओळख पटली असून त्याचे नाव अबू दगना अल-अल्बानी असे त्याचे नाव असल्याचे समोर आले आहे. पिस्तूल आणि मशिनगनद्वारे त्याने सोमवारी सेंट्रल व्हिएन्नामध्ये जमावावर गोळीबार केला असल्याचे त्याने व्हिडिओत म्हटले आहे. वाचा: तर, गृहमंत्री कार्ल नेहामर यांनी दिलेल्या माहितीनुसार, हल्लेखोराचे नाव कुजती फेजुलाई आहे. इस्लामिक स्टेटमध्ये सहभागी होण्यासाठी सीरियात जाण्याच्या गुन्ह्यासाठी हल्लेखोर कुजती फेजुलाईला एप्रिल २०१९ मध्ये २२ महिन्यांची शिक्षा ठोठावण्यात आली होती. अल्पवयीन गुन्हेगार कायद्यानुसार त्याची डिसेंबर महिन्यात तुरुंगातून सुटका करण्यात आली होती. या दहशतवादी हल्ल्या प्रकरणी १५ घरांची झडती घेण्यात आली असून काहींना अटक करण्यात आली आहे. वाचा: हल्लेखोरांनी वेगवेगळ्या ठिकाणांहून अंदाधुंद गोळीबार केला. या गोळीबारात अनेकजण जखमी झाले असून यामध्ये एका पोलिसाचा समावेश असल्याची माहिती पोलिसांनी दिली. तर, प्रत्युत्तरात केलेल्या कारवाईत पोलिसांनी एका संशयित हल्लेखोराला ठार केले आहे. करोनाच्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर ऑस्ट्रियात लॉकडाउन सुरू होणार होता. त्यामुळे व्हिएन्नात मोठी गर्दी होती. स्थानिक वेळ, सोमवारी रात्री आठ वाजण्याच्या सुमारास हा हल्ला झाला.