तीन पिशव्यांच्या आत ब्लँकेटमध्ये गुंडाळून नवजात बालकाला फेकले, तरीही जिवंत - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Tuesday, November 24, 2020

तीन पिशव्यांच्या आत ब्लँकेटमध्ये गुंडाळून नवजात बालकाला फेकले, तरीही जिवंत

https://ift.tt/35Z7sof
मेरठ: उत्तर प्रदेशातील (Meerut) येथे एका हृदय हेलावून टाकणारी घटना घडली आहे. येथे एक फेकून दिलेले (New born baby) सापडले. या नवजात बालकाला सीमेंटच्या रिकाम्या तीन पिशव्यांमध्ये भरून फेकून देण्यात आले होते. झुडुपांमधून मुलाच्या रडण्याचा आवाज ऐकून स्थानिक लोकांनी या नवजात बालकाला वाचवले. आश्चर्याची गोष्ट म्हणजे कांबळे आणि तीन सीमेंटच्या पिशव्यांमध्ये पूर्णपणे गुंडाळलेले असतानाही हे बालक जिवंत राहिले. या बालकाला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. ( found in of ) ही घटना मेरठच्या परतापूर ठाणे क्षेत्रातील शताब्दीनगर सेक्टर-४ मधील आहे. सोमवारी रात्री उशिरा लोकांनी झुडुपांमधून मुलाच्या रडण्याचा आवाज ऐकला. काही वेळानंतर तेथे लोकांची गर्दी जमा झाली. नंतर आवाज येणे बंद झाले. तेथे लोकांना थैली पडलेली दिसली. याच पिशवीतून मुलाच्या रडण्याचा आवाज ऐकू येत असावा असा अंदाज लोकांनी बांधला. नवजात बालकाला पाहून लोक आश्चर्यचकित झाले येणाऱ्या-जाणाऱ्या लोकांनी ही पिशवी झुडुपांमधून बाहेर काढली आणि ती उघडली. पिशवीमध्ये आणखी एक पिशवी बांधलेली आढळली. ती पिशवी उघडल्यानंतर आणखी एक पिशवी आत आढळली. तिसऱ्या पिशवीच्या आत एक कांबळे होते. लोकांनी कांबळे उघडून पाहिले. त्यात नवजात बालक होते. लोक हे नवजात बालक पाहून आश्चर्यचकित झाले. त्यानंतर तातडीने लोकांनी पोलिसांना माहिती दिली. त्यानंतर नवजात बालकाला रुग्णालयात नेण्यात आले. क्लिक करा आणि वाचा- पोलिस तपासणार सीसीटीव्ही फूटेज हे बालक अकाली जन्माला आले असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. त्याची नाळ देखील कापली गेलेली नव्हती. या बालकाचा जन्म काही वेळापूर्वीच झाल्याचे स्पष्ट झाले. आता पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही फूटेज शोधायला सुरुवात केली आहे. नवजात बालकाला झुडुपांमध्ये कोणी फेकले हे यावरून शोधण्याचा पोलिसांचा प्रयत्न आहे. क्लिक करा आणि वाचा- क्लिक करा आणि वाचा-