
नवी दिल्ली : सिनेमा आणि रंगमंचावरचे 'दिग्गज' म्हणून ओळखल्या जाणारे ज्येष्ठ बंगाली अभिनेते ( / ) यांचं निधन झालंय. रविवारी (१५ नोव्हेंबर २०२०) रोजी १२.१५ वाजता त्यांनी घेतला. सौमित्र चटर्जी त्यांच्यावर कोलकत्याच्या 'बेले व्यू क्लिनिक' या खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते. गेल्या ४० दिवसांपासून त्यांच्यावर उपचार सुरू होते. वाचा : ६ ऑक्टोबर रोजी करोना संक्रमणामुळे त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. १४ ऑक्टोबर रोजी त्यांनी करोना संक्रमणाला पराभूत केल्यानंतर सौमित्र चटर्जी यांना श्वासोच्छवासात अडथळे जाणवू लागले होते. त्यांचं मूत्रपिंडही निकामी झालं होतं. त्यामुळे त्यांच्या प्रकृतीत आणखीनच बिघाड झाला. डॉक्टरांनी त्यांना लाईफ सपोर्ट सिस्टमवर ठेवलं होतं. आज अखेर त्यांची प्राणज्योत मालवली. सौमित्र चटर्जी यांना चित्रपटसृष्टीतील आपल्या योगदानासाठी २००४ साली पद्मभूषण तर २०१२ साली दादासाहेब फाळके पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं होतं. सौमित्र चटर्जी यांचा जन्म १९ जानेवारी १९३५ रोजी पश्चिम बंगालच्या कोलकाता शहरात झाला होता. निर्माते-दिग्दर्शक सत्यजीत रे यांचे ते आवडते अभिनेते म्हणून ओळखले जात होते. सत्यजीत रे यांच्या 'अपुर संसार' या सिनेमातून सौमित्र यांनी आपल्या करिअरला सुरुवात केली होती. त्यानंतर अभिजान, चारुलता, अरण्यर दिन रात्री, आशानी संकेत, सोनर केल्ला, जोई बाबा फेलुनाथ, हिरक राजेर देशे, घारे बैरे अशा अनेक सिनेमांतील त्यांच्या भूमिकांना प्रेक्षकांनी मनमोकळी दाद दिली होती. त्यांच्या निधनानं केवळ बंगाली नाही तर देशभरातील कलासृष्टीकडून हळहळ व्यक्त करण्यात येतेय. वाचा : वाचा : वाचा :