फतेहपूरमध्ये दोन दलित बहिणींची हत्या, मृतदेह पाण्यात फेकले - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Tuesday, November 17, 2020

फतेहपूरमध्ये दोन दलित बहिणींची हत्या, मृतदेह पाण्यात फेकले

https://ift.tt/3pynPQp
फतेहपूर, : उत्तर प्रदेशातील जिल्ह्यात असोथर स्टेशन परिसरातील एका गावात सोमवारी दोन दलित अल्पवयीन मुलींची हत्या करून त्यांचा मृतदेह तलावात फेकल्याची घटना उघडकीस आली. या दोन्ही मुली बहिणी आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दोन्ही मुलींच्या मृतदेहावर डोळ्यांजवळ जखमेच्या खुणा आढळल्या आहेत. दोन्ही मुली दुपारी आपल्या घरातून सरपण झाडं तोडणीसाठी जंगलात गेल्या होत्या. रात्री उशिरापर्यंत घरी परतल्या नाहीत म्हणून ग्रामस्थांकडून त्यांची शोधाशोध सुरू करण्यात आली. दोन्ही मुलींचे मृतदेह रात्री उशिरा तलावातील पाण्यावर तरंगताना दिसले. त्यानंतर ग्रामस्थांकडून याबद्दल पोलिसांना सूचना देण्यात आली. या दोन्ही अल्पवयीन मुली अनुसूचित वर्गातील आहेत. यापैंकी मोठ्या बहिणीचं वय १२ वर्ष तर लहानं बहिणीचं वय ८ वर्ष होतं. वाचा : वाचा : पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल केलाय. बलात्कार करण्यात अपयशी ठरल्यानंतर दोन्ही मुलींची हत्या करून त्यांचा मृतदेह तलावात फेकल्याचा आरोप पीडित कुटुंबीयांकडून करण्यात आलाय. या प्रकरणाचा पोलिसांकडून अधिक तपास सुरू आहे. पोलिसांनी दोन्ही मृतदेह पोस्टमॉर्टेमसाठी पाठवले आहेत. पोस्टमॉर्टेम अहवाल हाती आल्यानंतरच दोन्ही मुलींच्या मृत्यूबद्दल अधिक माहिती देता येईल, असं पोलिसांनी म्हटलंय. उल्लेखनीय म्हणजे, उत्तर प्रदेशात दलित अत्याचाराच्या घटनांत सातत्यानं वाढ होताना दिसून येत आहे. वाचा : वाचा :