बाळासाहेब ठाकरे स्मृतिदिन: भुजबळ शिवतीर्थावर; फडणवीसांनी केलं ट्वीट - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Tuesday, November 17, 2020

बाळासाहेब ठाकरे स्मृतिदिन: भुजबळ शिवतीर्थावर; फडणवीसांनी केलं ट्वीट

https://ift.tt/36MfwIp
मुंबई: 'मंत्रालयावर भगवा फडकवण्याचं शिवसेनाप्रमुख यांचं स्वप्न नियतीनं, महाराष्ट्राच्या जनतेनं पूर्ण केलं आहे. आता मराठी माणसाला पुढं नेण्याचं त्यांचं दुसरं स्वप्न पूर्ण करण्यासाठी देखील आम्ही प्रयत्नांची पराकाष्ठा करू,' असा निर्धार अन्न व नागरी पुरवठामंत्री यांनी आज व्यक्त केला. () शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा आज आठवा स्मृतिदिन आहे. या निमित्तानं शिवाजी पार्कवरील त्यांच्या स्मृतिस्थळावर आदरांजली वाहण्यासाठी शिवसैनिक व नेत्यांनी गर्दी केली आहे. छगन भुजबळ यांनी देखील स्मृतिस्थळी जाऊन बाळासाहेबांना अभिवादन केलं. त्यानंतर पत्रकारांशी संवाद साधताना बाळासाहेबांचं दुसरं स्वप्न पूर्ण करण्याचा संकल्प त्यांनी बोलून दाखवला. 'दरवर्षीच मी बाळासाहेबांना अभिवादन करण्यासाठी येत असतो. पण यावेळचा स्मृतिदिन काहीसा वेगळा आहे. मंत्रालयावर शिवसेनेचा भगवा फडकवण्याचं व शिवसैनिकाला मुख्यमंत्री बनवण्याचं त्यांचं स्वप्न पूर्ण झालं आहे. महाराष्ट्राच्या जनतेचे प्रश्न सोडवण्याची जी जबाबदारी नियतीनं आमच्या खांद्यावर टाकली आहे, ती जबाबदारी पार पाडण्याची प्रतिज्ञा आम्ही आज करत आहोत,' असं ते म्हणाले. 'बाळासाहेबांचं स्वप्न केवळ मंत्रालयावर भगवा फडकवण्याचं नव्हतं. महाराष्ट्रातील प्रत्येक मराठी माणसाचं पाऊल पुढं पडलं पाहिजे हा त्यांचा ध्यास होता. ते स्वप्न पूर्ण करण्यासाठी आम्ही प्रयत्न करू,' असंही भुजबळ म्हणाले. फडणवीसांचं ट्वीट बाळासाहेबांना अभिवादन म्हणून राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी देखील ट्वीट केलं आहे. फडणवीसांनी बाळासाहेबांचा एक फोटो ट्वीट केला आहे. 'आमचे हृदयस्थान, मार्गदर्शक, प्रेरणास्त्रोत हिंदूहृदयसम्राट, शिवसेनाप्रमुख स्व. बाळासाहेब ठाकरे यांना स्मृतिदिनी कोटी कोटी अभिवादन,' असं त्यांनी ट्वीटमध्ये म्हटलं आहे. वाचा: वाचा: