
जहानाबाद: बिहारमधील () जहानाबादमध्ये एक अशी व्यक्ती आहे जी नीतीश कुमार () मुख्यमंत्री बनल्यानंतर दरवेळी आपले एक बोट कापून ते देवाला अर्पण करते. असे या व्यक्तीचे नाव असून ही व्यक्ती मुख्यमंत्री यांची चाहती आहे. नीतीश कुमार पुन्हा मुख्यमंत्री झाल्यानंतर अनिल शर्मा यांनी सोमवारी आपले चौथे बोट कापून गोरेय्याबाबाच्या मंदिरात अर्पण केले. अनिल शर्मा यांचे नीतीश कुमार हे आवडते नेते असल्याने शर्मा आपले बोट देवाला अर्पण करत आले आहेत. यामुळे अनिल शर्मा यांना लोक आता ()या नावाने ओळखतात. उत्तर भारतात अंगुलीमान नावाचा एक बुद्धकालीन दरोडेखोर होऊन गेला. तो लोकांची बोटे कापून गळ्यातील माळेत घालत असे. बुद्धांशी गाठ पडल्यानंतर त्याने बुद्धांचे अनुयायीत्व स्वीकारले होते. याच अंगुलीमालावरून आता अनिल शर्मा यांना ओळखले जात आहे. (jehanabad's ) ही घटना जिल्ह्यातील घोसी पोलिस ठाण्याच्या क्षेत्रातील एका गावातील आहे. ४५ वर्षीय अनिल शर्मा उर्फ अलीबाबा यांनी नीतीश कुमार मुख्यमंत्री झाल्याबद्दल आतापर्यंत एकूण तीन बोटे कापलेली आहेत. १६ नोव्हेंबर या दिवशी नीतीश कुमार यांनी शपथ घेतल्यानंतर त्यांनी आपले आणखी एक बोट कापले. वैना या गावातील रहिवासी असलेले अनिल शर्मा यांनी नीतीश कुमार यांनी सातव्यांदा मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर आपल्या हाताचे पहिले बोट कापून ते गोरेय्याबाबाला चढवले होते. अनिल शर्मांचे हे वेड गेल्या अनेक वर्षांपासूनचे आहे. जेव्हा जेव्हा बिहारमध्ये नीतीश कुमार सत्ता हस्तगत करतात, तेव्हा तेव्हा अनिल शर्मा आपले हाताचे बोट गोरेय्याबाबांना अर्पण करत आसतात. क्लिक करा आणि वाचा- लोक आश्चर्यचकित आहेत अनिल शर्मांचे हे जगावेगळे वेड पाहून लोक देखील आश्चर्यचकित आहेत. आपल्याला असे करण्याने आनंद मिळतो, असे अनिल शर्मा सांगतात. या वेळी देखील बिहारची सत्ता नीतीश कुमार यांना मिळावी असा नवस त्यांनी गोरेय्याबाबांकडे केला होता. आपली मागणी देवाने मान्य केल्यामुळेच आपण आपले बोट कापून ते अर्पण केल्याचे शर्मा सांगतात. गेली अनेक वर्षे ते असेच करत आले आहेत. क्लिक करा आणि वाचा- क्लिक करा आणि वाचा-