
ज्येष्ठ कॉंग्रेस नेते अहमद पटेल यांचे आज करोनाने निधन झाले. ते ७१ वर्षांचे होते. ऑक्टोबर महिन्यात पटेल यांना करोनाची लागण झाली होती. त्यानंतर दिल्लीच्या एका रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते. शरीरातील बहुतांश अवयव निकामी झाल्याने बुधवारी पहाटे तीन वाजता त्यांनी अखेरचा श्वास घेतला. फैजल पटेल यांनी ट्विटरवर ही माहिती दिली.