नवी दिल्ली: माजी पंतप्रधान () यांच्या जयंतीनिमित्त () यांनी त्यांच्या स्मृतींना उजाळा दिला आहे. माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या जयंतीदिनी पंतप्रधान मोदी यांनी त्यांना नमन केले आहे. तर काँग्रेसचे माजी अध्यक्ष () यांनी आज शक्तिस्थळी जात इंदिरा गांधी यांना श्रद्धांजली अर्पण केली. इंदिरा गांधींचा जन्म १९ नोव्हेंबर १९१७ रोजी झाला होता. पिता पंडित जवाहरलाल नेहरू (Pandit Jawaharlal Nehru) यांच्याकडून त्यांना राजकीय वारसा प्राप्त झाला होता. राहुल गांधी यानी दुर्मिळ छायाचित्र शेयर करत दिला इंदिरा गांधींच्या स्मृतींना उजाळा काँग्रसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांना त्यांच्या जयंतीदिनी श्रद्धांजली अर्पण केली. त्यांनी इंदिरा गांधी यांचे एक जुने छायाचित्र ट्विटरवर शेयर केले. राहुल गांधी आपल्या ट्विटमध्ये म्हणतात की, संपूर्ण देश अजूनही इंदिरा गांधींच्या विलक्षण नेतृत्वाचे स्मरण करतो, परंतु तरीही मी तिला एक अतिशय प्रेमळ आजी म्हणूनच पाहतो. तिची शिकवण मला सतत प्रेरणा देते. राहुल गांधींनी ट्विटरवर ट्विट करुन इंदिरा गांधींचे हे दुर्मिळ छायाचित्र इंस्टाग्रामवर शेयर केले होते. राहुल गांधी यांनी देशाच्या पहिल्या महिला पंतप्रधानांच्या स्मारकाला भेट देत त्यांना श्रद्धांजली वाहिली. पाकिस्तानचे दोन स्वतंत्र भाग करणाऱ्या इंदिरा गांधी यांना 'आयरन लेडी' या नावाने ओळखले जाते. एकेकाळी 'गूंगी गुडि़या' म्हणून ओळख असलेल्या इंदिरा गांधी यांनी आपल्या कठोर निर्णयांद्वारे सर्वांनाच चकीत केले होते. त्यांनी संस्थानिकांचे तनखे समाप्त केले. तसेच बँकांचे राष्ट्रीयकरण करण्याचे धाडसी निर्णय घेतला. त्यानंतर त्या भारतीय राजकारणाच्या आकाशात तळपत राहिल्या. क्लिक करा आणि वाचा- जानेवारी १९६६ ते मार्च १९७७ पर्यंत त्या देशाच्या पंतप्रधान होत्या. यानंतर सन १९८० मध्ये त्या पुन्हा देशाच्या पंतप्रधान बनल्या. ३१ ऑक्टोबर, १९८४ मध्ये त्यांच्या अंगरक्षकांनीच त्यांची हत्या केली. क्लिक करा आणि वाचा- क्लिक करा आणि वाचा-