
मुंबई- 'तारक मेहता का उल्टा चश्मा' मालिकेत ही व्यक्तिरेखा साकारणारे हा आता नावाजलेला चेहरा झाला आहे. देशभरात त्यांना त्यांच्या मूळ नावाने कमी आणि 'पोपटलाल' नावानेच जास्त ओळखलं जातं. मालिकेत श्याम यांची व्यक्तिरेखा कंजूस दाखवण्यात आली असली तरी खऱ्या आयुष्यात ते फार श्रीमंतही आहेत. अंजली भाभीपेक्षा जास्त घेतात एका दिवसाचं मानधन तारक मेहता शो प्रसिद्ध करण्यात इतर कलाकारांप्रमाणेच श्याम पाठक यांचं योगदानही मोठं आहे. मालिकेत अंजली भाभी एका दिवसाला २५ हजार रुपये मानधन घेते. तर पोपटलाल दिवसाला २८ हजार रुपये मानधन घेतात. स्वतः श्याम यांनी त्यांच्या मिळकतीबद्दल कधीही सांगितलं नाही. पण मीडिया रिपोर्टमध्ये त्यांच्या मानधनाबद्दल बोललं जातं. श्याम पाठक यांच्याकडे आहे कोट्यवधींची संपत्ती- श्याम पाठक हे कोट्यवधी रुपयांच्या संपत्तीचे मालक आहे. एका वेबसाइटने प्रसिद्ध केलेल्या वृत्तानुसार, त्यांच्याकडे जवळपास १५ कोटी रुपयांची एकूण संपत्ती आहे. याशिवाय त्यांच्याकडे मर्सिडीज गाडीही आहे. सुरुवातीला पोपटलालची व्यक्तिरेखा होती काहीशी वेगळी- पोपटलाल ही व्यक्तीरेखा मालिकेत आज ज्या स्वरुपात दिसते तशीच ती आधी नव्हती. एका मुलाखतीत स्वतः श्याम पाठक म्हणाले की, 'सुरुवातीला जेव्हा पोपटलाल ही व्यक्तिरेखा तयार करण्यात आली तेव्हा ती दारू पिणारी आणि सतत पान खाऊन थुंकणारी दाखवण्यात येणार होती. पण आम्हाला ती गोष्ट दाखवायची नव्हती. कारण आमच्या मालिकेचा एक मोठा चाहता वर्ग आहे. त्यामुळे आम्ही त्याच्या स्वभावावर अधिक लक्ष दिलं.'