
अबुधाबी: आयपीएलच्या १३व्या हंगामात प्ले ऑफमधील चुरस आता अखेरच्या लढतीपर्यंत रंगणार आहे. आज होणाऱ्या डबल हेडरमध्ये किंग्ज इलेव्हन पंजाबची ( vs ) लढत याआधीच बाहेर गेलेल्या विरुद्ध होणार आहे. किंग्ज इलेव्हन अद्याप प्ले ऑफच्या शर्यतीत आहे. पण त्यासाठी आज सुपर किंग्ज विरुद्ध त्यांना मोठा विजय मिळवावा लागले. त्याच बरोबर पुढील सामन्यात अन्य संघांच्या कामगिरीवर अवलंबून रहावे लागेल. वाचा- दोन्ही संघांचा हा अखेरचा म्हणजे १४वा सामना आहे. चेन्नई याआधीच प्लेऑफच्या लढतीमधून बाहेर झाल्याने त्यांच्याकडे गमवण्यासारखे काहीच नाही. तर गेल्या सामन्यात राजस्थान रॉयल्सकडून सात विकेटनी पराभव झाल्याने किंग्ज इलेव्हनला मोठा धक्का बसला आहे. केएल राहुलच्या नेतृत्वाखाली पंजाबने सलग पाच सामन्यात विजय मिळून प्ले ऑफमधील आव्हान कायम ठेवले आहे. गेल्या सामन्यातील पराभवामुळे आता प्ले ऑफचे भविष्य त्यांच्या हातात राहिले नाही. चेन्नईचा पराभव करून देखील अन्य सामन्यांच्या निकालावर त्यांना अवलंबून रहावे लागले. वाचा- सनरायजर्स हैदराबादने १३ सामन्यात १२ गुण मिळवले आहेत आणि ते गुणतक्त्यात चौथ्या स्थानावर आहेत. त्यांची अखेरची लढत २ नोव्हेंबर रोजी मुंबई इंडियन्स विरुद्ध होणार आहे. ३ नोव्हेंबर रोजी दिल्ली कॅपिटल्स आणि रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू यांच्यात लढत होणार आहे. या लढतीत जो विजय मिळवेल त्याचे १६ गुण होतील. सनरायजर्सचा अखेरच्या सामन्यात पराभव झाला तर किंग्ज इलेव्हनला प्ले ऑफचे तिकीट मिळू शकते. त्यासाठी आज पंजाबला विजय मिळवावा लागले. वाचा- आयपीएलच्या इतिहासात प्रथमच प्ले ऑफच्या शर्यतीतून बाहेर झालेल्या चेन्नईला अखेर गोड व्हावा असे नक्कीच वाटेल. त्यांनी याआधीच्या दोन सामन्यात विजय मिळवला आहे. चेन्नईकडून ऋतुराज गायकवाडने सलग दोन अर्धशतकी खेळी केली होती. तर रविंद्र जडेजा देखील चांगल्या फॉर्ममध्ये आहे. पंजाबकडून कर्णधार राहुलने स्पर्धेत सर्वाधिक धावा केल्या आहेत. ख्रिस गेल देखील स्फोटक खेळी करत आहे. गेल्या सामन्यात त्याने ९९ धावा केल्या होत्या. निकोलस पूरन चौथ्या क्रमांकावर चांगली कामगिरी करत आहे. मयांक अग्रवाल खेळणार की नाही हे अद्याप स्पष्ट होऊ शकले नाही.