
गोवा : भारतीय नौदलाच्या '' या शिकाऊ आणि लढाऊ विमानाला गोव्यात अपघात झाला. गुरुवारी सायंकाळी ५ वाजल्याच्या सुमारास अरबी समुद्रात ही घटना घडल्याचं समजतंय. () या अपघातात एका वैमानिकाला बचावण्यात यश आलंय तर दुसऱ्या वैमानिकाच्या शोधासाठी सर्च ऑपरेशन सुरू आहे. यासाठी सरफेस युनिट (जमिनीवरील तुकडी) आणि एअर युनिट (हवाई तुकडी) ची मदत घेतली जातेय. नेमका कसा झाला? याच्या तपासासाठी सविस्तर चौकशी करण्यात येणार असल्याचंही भारतीय नौदलाकडून स्पष्ट करण्यात आलंय. वाचा : वाचा : २६ नोव्हेंबर २०२० रोजी सायंकाळी ५.०० वाजल्याच्या सुमारास शिकावू विमान मिग २९ के नं उड्डाण घेतलं होतं, अशी माहिती नौदलाकडून देण्यात आली. या लढावू जहाजावर अपघातग्रस्त मिग २९ तैनात करण्यात आलं होतं. या विमानानं नुकत्याच झालेल्या नौदलाच्या 'मलबार' कवायतीतही सहभाग घेतला होता. मलबारमध्ये भारत, अमेरिका, ऑस्ट्रेलिया आणि जपान या देशांच्या तुकड्यांचा सहभाग होता. या अगोदर फेब्रुवारी महिन्यातही भारतीय नौदलाच्या 'मिग २९ के' या विमानाला अपघाताला सामोरं जावं लागलं होतं. हा अपघात गोव्याच्या समुद्रकिनारी झाला होता. या अपघातादरम्यान पायलटला सुखरुप वाचवण्यात यश आलं होतं. वाचा : वाचा :