
बिहार विधानसभा निवडणकीच्या दुसऱ्या टप्प्यातील मतदानाला सुरुवात झाली आहे. बिहारच्या १७ जिल्ह्यांमधील ९४ जागांवर आज मतदान होत आहे. बिहारमध्ये प्रमुख लढत ही एनडीए विरुद्ध महाआघाडी यांच्याच होत आहे. करोना महासाथीच्या या संकटकाळात होत असलेल्या या निवडणुकीत मतदान केंद्रांवर सर्व काळजी घेण्यात आली आहे. करोनाच्या गाइडलाइन्सचे पालन केले जात आहे. पाहुयात निवडणुकीतील पहिल्या टप्प्यातील मतदानाचे लाइव्ह अपडेट्स... Live अपडेट्स... >> भागलपूरच्या एका मतदान केंद्रावर आपल्या मतदानाचा हक्क बजावण्यासाठी रांगेत उभे मतदार >> बिहारचे उपमुख्यमंत्री सुशीलकुमार मोदी यांनी पाटण्यात राजेंद्र नगरमधील एका मतदान केंद्रावर केले मतदान. >> आज बिहारच्या १७ जिल्ह्यांमधील ९४ जागांवर आज मतदान होत आहे. >> बिहारमध्ये विधानसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यात आज एकूण ९४ जागांवर मतदान होत आहे. >> दुसऱ्या टप्प्यात महाआघाडीचे मुख्यमंत्रिपदाचे उमेदवार तेजस्वी यादव हे देखील मैदानात >> एकूण १,४६३ उमेदवार, २.८५ कोटी मतदारांसाठी ४१,३६२ मतदान केंद्रांची व्यवस्था >> महाराजगंजमध्ये सर्वाधिक २७, तर दरौली येथे सर्वात कमी उमेदवार >> एनडीएमध्ये भाजपचे ४६, जेडीयूचे ४३ आणि व्हीआयपीचे पाच उमेदवार >> महागठबंधनमध्ये आरजेडीचे ५६, काँग्रेसचे २४ आणि डाव्या पक्षांचे १४ उमेदवार