पाटणा : च्या तिसऱ्या आणि शेवटच्या टप्प्यातील मतदानाला सुरुवात झालीय. या टप्प्यात १५ जिल्ह्यांतील ७८ विधानसभा मतदारसंघांचा समावेश आहे. ७८ मतदारसंघांतून तब्बल १२०४ आपलं नशीब आजमावत आहेत. सकाळी ७.०० वाजल्यापासून या मतदानाला सुरुवात झालीय. हा मतदानाचा शेवटचा टप्पा असून येत्या १० नोव्हेंबर रोजी निवडणुकीचा निकाल जाहीर होईल. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विटरवरून जनतेला मतदानाचं आवाहन केलंय. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जनतेला मास्क परिधान करण्याचं तसंच सोशल डिस्टन्सिंगच्या नियमांचं पालन करत मतदानाचा नवा रेकॉर्ड कायम करण्याचं आवाहन केलंय. वाचा : वाचा : आरजेडी नेते तेजस्वी यादव यांनीही जनतेला लोकशाहीच्या या पावन पर्वात भाग घेण्याचं आवाहन केलंय. या निवडणुकीत बिहार आपलं भविष्य निश्चित करणार असल्याचं त्यांनी म्हटलंय. सोबतच, मुख्यमंत्री आता थकलेत त्यांना विश्रामाची आवश्यकता असल्याचंही तेजस्वी यादव यांनी म्हटलंय. दुसरीकडे, लोक जनशक्ती पक्षाचे प्रमुख चिराग पासवान यांनीदेखील 'नितीश कधीही मुख्यमंत्री बनणार नाहीत' असं सुतोवाच केलंय. यावळी, प्लुरल्स पक्षाच्या अध्यक्ष पुष्पम प्रिया यादेखील मतदानासाठी दरभंगामध्ये मतदान केंद्रावर दाखल झालेल्या दिसल्या. तर राज्यसभा खासदार अहमद अशफाक करीम यांनी कटिहारमध्ये एका मतदान केंद्रावर मतदानाचा हक्क निभावला. लोकशाही जनता दल (LJD) प्रमुख शरद यादव यांची मुलगी सुभाषिनी राज राव मधेपुरामध्ये मतदान केलं. वाचा : वाचा : दरम्यान, आरजेडी नेते लवली आनंद यांनी सहरसा विधानसभा मतदारसंघात काही ठिकाणी ईव्हीएम मशीनमध्ये बिघाड झाल्याची तक्रार केलीय. इथं अनेक बुथवर खराब ईव्हीएम असल्याकारणानं नागरिकांना त्रासाला सामोरं जावं लागवत असल्याची तक्रार त्यांनी केली. त्यानंतर मात्र ईव्हीएम दुरुस्ती करण्यात आली. या टप्प्यात सिमरी बख्तियारपूर आणि मधेपुरा मतदार संघाचाही समावेश आहे. सिमरी बख्तियारपूरमधून विकासशील इन्सान पार्टीचे (VIP) अध्यक्ष मुकेश सहनी आणि मधेपुरातून जन अधिकार पक्षाचे अध्यक्ष पप्पू यादव निवडणुकीत उभे आहेत. या निवडणुकीत दोघांचीही प्रतिष्ठा पणाला लागलीय. मतदानासाठी करोनाचे सगळे नियम पाळून तयारी पूर्ण करण्यात आली आहे. वाचा : वाचा :