
नवी दिल्ली: भारतीय क्रिकेट संघातील सर्वात घातक गोलंदाज आणि किंग जसप्रित बुमराहची स्टाइल सर्वात वेगळी आणि घातक समजली जाते. जगभरातील दिग्गज फलंदाज बुमराहला सावधपणे खेळतात. जगातील अनेक खेळाडू बुमराहची कॉपी करण्याचा प्रयत्न करतात. यातील काहीचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. अशाच एक व्हिडिओ चर्चेत आला आहे. वाचा- आयपीएल अधिकारी दिपांशु काबरा यांनी सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर केला आहे. यात लहान मुलगा बुमराहसारखी गोलंदाजी करताना दिसतोय. व्हिडिओत लहान मुलगा बुमराहसारखी गोलंदाजी करतो आणि विकेट मोडतो. वाचा- व्हिडिओत संबंधित मुलगा घरातील बागेत गोलंदाजी करताना दिसत आहे. एकच विकेट लावली होती. तो जसप्रित बुमराह प्रमाणे गोलंदाज करत येतो आणि यॉर्कर चेंडू टाकतो. यात विकेटचे दोन तुकडे होतात. हा व्हिडिओ शेअर करताना IPS अधिकारी दिपांशु काबरा म्हणतात, भेटा बेबी बुमराहला, देवाची कृपा त्याच्यावर असू दे. हा व्हिडिओ शेअर करताना त्यांनी आणि मुंबई इंडियन्सला टॅग केले आहे. वाचा-