
मुंबई: बॉलिवूडचे महानायक यांच्या संपत्तीबद्दल अनेकदा चर्चा झाल्या. कोट्यधीश असलेल्या बिग बींच्या गाड्या, बंगले यांचे फोटो नेहमीच सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. त्यांची प्रत्येक इच्छा, स्वप्नं पूर्ण झाली आहेत. पण असं एक स्वप्न आहे, जे कोट्यधीश असलेल्या अमिताभ यांना पूर्ण करता येत नाहीए. आपल्या पालकांचं अपूर्ण स्वप्न पूर्ण करण्यासाठी यांनी अनेकदा प्रयत्न केले, पण ते काही केल्या पूर्ण होत नाही. तुम्ही म्हणाल, असं कोणती गोष्ट आहे, की अमिताभ पैशांनी विकत घेऊ शकत नाहीत. वडिलांची एक इच्छा अमिताभ यांना पूर्ण करता येत नाहीए, ती म्हणजे अलाहाबादेत असलेलं एक घर त्यांना विकत घेता येत नाहीए. अमिताभ यांच्यासाठी हे घर यासाठी खास आहे कारण, अमिताभ यांचे वडील आणि आई एकेकाळी याच घरात भाड्यानं राहत होते. १९८४मध्येच अमिताभ यांनी हा बंगला विकत घेण्याची इच्छा व्यक्त केली होती. मात्र अद्यापही ही इच्छा पूर्ण होऊ शकली नाही. वडिलांची आठवण जतन करून ठेवावी, यासाठी अमिताभ यांनी अनेकदा प्रयत्न केले, परंतु त्यांच्या या प्रयत्नांना यश आलं नाही. ही संपत्ती सध्या एका ट्रस्टकडे असल्यानं अमिताभ यांनी हा बंगला विकत घेण्यासाठी अडचणी येत आहेत.काही दिवसांपूर्वी अमिताभ यांनी सोशल मीडियावर या घराचे फोटो शेअर केले होते.