
मुंबई: निर्णयाचं कौतुक विविध गाण्यांवर आपली अदाकारी दाखवणारी अभिनेत्री तिची मतं, भूमिका स्पष्टपणे मांडत असते. मराठी भाषेवरील तिचं प्रेम अनेकदा तिच्या चाहत्यांनी अनुभवलं आहे. मराठी भाषा जपण्यासाठी तिनं एक निर्णय घेतला आहे. यापुढे शक्य त्या मराठी कार्यक्रमांमध्ये हिंदी गाण्यांवर नृत्य करणार नाही, असं सोनालीनं ठरवलं आहे. तिच्या या निर्णयाचं सोशल मीडियावर कौतुक होतंय. सोनालीनं आजवर अनेक कार्यक्रमांमध्ये नृत्य सादरीकरण केलंय. तिच्या अभिनयासह नृत्यकौशल्याचंही कौतुक होत असतं. आता तिनं घेतलेल्या या भूमिकेविषयीही बोललं जातंय.